शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सर्व शहरे आणि महत्त्वाच्या गावांवर सीसीटीव्हीची नजर, दोन दिवसांत अध्यादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:09 IST

सीसीटीव्हीमुळे गुन्हे रोखता येतात आणि गुन्हे उघड होण्यासाठीही सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे राज्यातील सर्व पोलीस ठाणे, सर्व शहरे आणि महत्त्वाच्या गावांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

औरंगाबाद : सीसीटीव्हीमुळे गुन्हे रोखता येतात आणि गुन्हे उघड होण्यासाठीही सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे राज्यातील सर्व पोलीस ठाणे, सर्व शहरे आणि महत्त्वाच्या गावांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.जालना येथे नितीन कटारिया आणि गोविंद गगराणी यांच्या नुकत्याच झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्या कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, पूर्वी जिल्हा नियोजन विकास समितीकडून साडेतीन ते दहा टक्के निधी उपलब्ध होई. आता मात्र आम्ही सीसीटीव्हीच्या खर्चासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष (हेड) तयार केले आहे, याबाबतचा अध्यादेश दोन दिवसांत निघेल.मुंबई, पुण्याप्रमाणेच औरंगाबादसारख्या शहरातील महिला मोठ्या प्रमाणात नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर पडतात. महिलांसोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिले. काम करणाºया महिलांसाठी पुणे पोलिसांनी एक मॉडेल तयार केले. त्या मॉडेलचा वापर अन्य शहरांत करता येतो का, याची चाचपणी केली जात आहे. या मॉडेलनुसार आय.टी. सेक्टरमध्ये काम करणाºया १० ते २० महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी एका पोलीस हवालदारावर सोपविली जाते. तो त्यांचा सुरक्षारक्षक म्हणूनच कायम त्यांच्या संपर्कात असतो. यामुळे त्यांच्यात सुरक्षेची भावना येते. शिवाय महिला आयपीएस अधिकारी आणि आमदार महिलांची कमिटी स्थापन केली. कमिटीकडूनही आम्ही महिलांसंबंधी गुन्हे कमी होण्यासाठी प्रयत्न केले. यासोबतच सोशल इंजिनीअरिंगचे कामही पोलिसांना करावे लागत आहे.भाजपा राणेंना जवळ करणार नाहीनारायण राणे ही अपप्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीला महाराष्ट्रातील जनतेने कायम दूर ठेवले आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत हा पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांचा नारा आहे, असे असताना आमचा मित्रपक्ष भाजपा राणेंना पक्षात घेऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणार नाही, अशी कोपरखळी केसरकर यांनी मारली.कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला भारतात यायचे असून, त्याला भारतात आणण्यास भाजपाने सेटलमेंट केल्याचा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आरोप केला होता, याबाबत ते म्हणाले की, राज हे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. मात्र गुन्हेगाराबद्दलची सर्वाधिक माहिती ही पोलिसांकडेच असते.