शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीगडावर सीसीटीव्हीची नजर

By admin | Updated: January 17, 2017 01:55 IST

सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या फुटेजच्या आधारे मागील आठवड्यात काही पाकीटमार व मोबाईलचोरी करणाऱ्या महिलांना जेरबंद करण्यात यश आले

जेजुरी : खंडोबा मंदिर व गडकोट आवारामध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे भाविकांच्या गर्दीच्या वेळी अनुचित प्रकारांवर आळा बसत असल्याचे निदर्शनास येत असून, सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेल्या फुटेजच्या आधारे मागील आठवड्यात काही पाकीटमार व मोबाईलचोरी करणाऱ्या महिलांना जेरबंद करण्यात यश आले आहे. रविवारी (दि. १५) मंदिर व गडकोट आवारामध्ये काही अल्पवयीन मुलांच्या संशयास्पद हालचाली कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असल्याचे मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांनी सांगितले. सध्या लग्नसराईचे दिवस व सहलींचा मौसम असल्याने खंडोबा मंदिरामध्ये देवदर्शनासाठी भाविकांची लक्षणीय गर्दी दिसून येत आहे. विशेषत: रविवार हा शासकीय सुटीचा व खंडोबाच्या देवदर्शनाचा वार असल्याने मोठ्या संख्येने भाविक गडावर येतात. या गर्दीचा फायदा घेत काही पाकीटमार व मोबाईलचोर हात साफ करून घेतात. मागील काही वर्षी पाकीटमार, दागिनेचोरी व मोबाईल गहाळ झाल्याच्या घटना पोलीस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. भाविकांच्या वाढत्या तक्रारी पाहता देवसंस्थान विश्वस्त समितीने गडकोट आवार व मंदिर परिसरात ५४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा गतिमान केल्यामुळे पाकीटमार अथवा मोबाईलचोरी करणाऱ्या महिला अथवा अल्पवयीन मुले चित्रणात कैद होत आहेत. तसेच अनुचित प्रकार करणाऱ्या अशा व्यक्तींना प्रतिबंध करणे अथवा पोलिसांच्या ताब्यात देणे सुरक्षारक्षकांना सोपे झाले आहे. सध्या ५४ कॅमेरे कार्यान्वित असून पुढील काही दिवसांमध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या देवसंस्थानच्या भक्तनिवास, गडकोट पायरीमार्ग व शहराच्या प्रमुख चार चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणार असल्याचे तसेच सुमारे १२ ते १५ कॅमेरे बसविणार असल्याचे प्रमुख विश्वस्त संदीप घोणे यांनी सांगितले. (वार्ताहर)।दोन मुलांचे पलायनदोन दिवसांपूर्वी रविवारी गर्दीचा फायदा घेत काही अल्पवयीन अनोळखी मुले संशयास्पद हालचाली करताना कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. हे चित्रण पाहून मंदिरातील सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले, तर दोन मुलांनी पलायन केले. भविष्यात भाविकांच्या सुरक्षिततेवर व सोई-सुविधांवर देवसंस्थान भर देणार असल्याचे घोणे यांनी माहिती देताना सांगितले.