अकोला : कापूस पणन महासंघाच्या (सीसीआय) वतीने चुकीच्या पद्धतीने सरकीचे वितरण होत असल्याने कापूस दरवाढीला ह्यब्रेकह्ण लागला आहे. दरवाढ होत नसल्याने उत्पादकांनी सीसीआयकडे पाठ फिरवत व्यापार्यांना कापूस विकण्यास सुरुवात केली आहे. व्यापार्यांकडून शेतकर्यांना क्विंटलमागे ५00 रुपयांपर्यंत अधिक दर दिला जात असल्याने शेतकर्यांचा ओढावा व्यापारी वर्गाकडे वाढला आहे. खरिपात कापूस उत्पादन घेणार्या शेतकर्यांकडून सीसीआयला मोठय़ा प्रमाणावर कापूस विकला जातो. त्यामुळे हंगामात दररोज सीसीआयकडे तीन हजार क्विंटलपेक्षा अधिक कापूस एकट्या अकोला जिल्ह्यातून जात होता. आता हे प्रमाण कमालीचे घटले आहे. बहुतांश शेतकर्यांनी त्यांच्याकडील कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत राखून ठेवला होता; मात्र सीसीआयकडून कापसाला क्विंटलमागे ३९५0 रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला नाही. हंगाम संपत आला तरी दरवाढ करण्यात आली नाही. उलट व्यापार्यांकडून शेतकर्यांना क्विंटलमागे ४६५0 रुपये दर मिळत आहे. तब्बल ५00 ते ७00 रुपये क्विंटलमागे अधिक मिळत असल्याने शेतकर्यांनी सीसीआयकडे पाठ फिरवून व्यापार्यांना कापूस विकणे सुरू केले आहे. *गाठीचे दर वाढले तरी कापसाची दरवाढ नाही सीसीआयकडून कापूस खरेदी केल्यानंतर प्रक्रिया करून रुईच्या गाठी केल्या जातात. या गाठीचे दर वाढले आहे. सरकीच्या तेलासोबतच ढेपीची मागणी वाढली असून, त्यामुळे त्यांचे दरही वाढले आहेत. असे असतानाही कापसाला सीसीआयकडून दरवाढ दिली जात नसल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर आहे. चुकीच्या पद्धतीने सरकी वितरणाचा फटका ४सीसीआयकडून आवश्यकता व क्षमतेपेक्षा अधिक सरकीचे वितरण तेल काढणार्या कंपन्यांना होत आहे. त्यामुळे या कंपन्या सीसीआयला सरकीचे दर वाढवून देण्यास तयार नाही. परिणामी सीसीआयला कापसाचे दर वाढविता आले नाहीत.
सीसीआयकडे कापसाचा ओघ ओसरला
By admin | Updated: April 8, 2015 01:43 IST