शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंहगड’ इन्स्टिट्यूटवर सीबीआयचे छापे

By admin | Updated: April 22, 2017 04:31 IST

उच्च शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या विविध कार्यालयांसह संस्थापक-अध्यक्ष मारुती नवले यांच्या राहत्या घरी आणि फार्म हाऊसवर कें द्रीय गुन्हे

पुणे : उच्च शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सिंहगड इन्स्टिट्यूटच्या विविध कार्यालयांसह संस्थापक-अध्यक्ष मारुती नवले यांच्या राहत्या घरी आणि फार्म हाऊसवर कें द्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी छापे टाकले. सेंट्रल बँकेच्या एका निवृत्त अधिकाऱ्यासह दोन अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन सुमारे ७५ कोटींचे कर्ज घेऊन ही रक्कम अन्यत्र वळवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी सीबीआयने नवले यांच्यासह सेंट्रल बँकेचे तत्कालीन सहाय्यक महाव्यवस्थापक ए. जी. सावंत, वरिष्ठ व्यवस्थापक विद्याधर पेडणेकर, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीसह पाच जणांविरुद्ध ३१ मार्च रोजी गुन्हा दाखल केला होता. नवलेंनी कर्जासाठी अर्ज दाखल करताना संस्थेच्या सर्व शिक्षण संस्था आणि शाखांमध्ये नवीन बांधकाम, साहित्याचा पुरवठा, सुधारणेसोबतच नऱ्हे येथे नवीन डेंटल कॉलेज सुरु करणार असल्याची माहिती दिली होती. चुकीची माहिती देऊनही बँकेच्या कॉर्पोरेट शाखेचे सहायक महाव्यवस्थापक सावंत, यांनी नवलेंना कर्ज देण्याची शिफारस केली. त्यानुसार ७५ कोटी १ लाखांचे कर्ज १७ डिसेंबर २०१२ रोजी मंजूर करण्यात आले. कोणत्याही स्पष्ट प्रस्तावाशिवाय हे कर्ज देण्यात आले. कोणत्याही प्रकारची पडताळणी करुन पाहण्यात आली नव्हती. कर्जाची रक्कम देताना मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यात आली नाहीत. संस्थेने बनावट कागदपत्रे बँकेला सादर केली. त्यामध्ये आर्किटेक्ट प्लॅनसह नऱ्हे येथील डेंटल कॉलेजसाठी २१ कोटी २० लाखांचे बनावट कर्ज दाखवण्यात आले. वास्तवीक नऱ्हे येथे हे रुग्णालयच बांधण्यात आलेले नाही. बँकेच्या अधिकाऱ्यांनी या अपहारामध्ये नवले यांना साथ दिली. नवले यांनी कर्जाची परतफेड न केल्याने हे खाते एनपीएला गेले. बँकेला ५८ कोटी ४ लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. त्याअनुषंगाने हे छापे टाकण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. (प्रतिनिधी)खाते, लॉकर्स तपासणारसिंहगड इन्स्टिट्यूटच्या मारुती नवले यांच्या घरासह एनडीए रस्त्यावरील फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला. यासोबतच सिंहगडच्या एरंडवण्यातील कॉर्पोरेट आॅफीससह वडगाव, नऱ्हे, लोणावळा, कोंढवा आणि वारज्यातील शाखांवरही छापे टाकण्यात आले. सावंत यांच्या नाशिकमधील राहत्या घरी आणि पेडणेकर यांच्या मुंबईतील निवासस्थानी छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या सर्वांच्या बँक खात्यांसह लॉकर्सचीही तपासणी केली जाणार असल्याचे अधीक्षक एम. आर. कडोळे यांनी सांगितले.