शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

‘सनातन’ साधकांच्या घरांवर सीबीआय छापे

By admin | Updated: June 2, 2016 03:21 IST

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करीत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने बुधवारी पुणे आणि पनवेल येथील

पुणे/नवी दिल्ली : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करीत असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने बुधवारी पुणे आणि पनवेल येथील सनातन संस्थेच्या साधकांच्या घरांवर छापे टाकल्याने या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाली आहे. दरम्यान, डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांची ओळख पटली असून, सनातन संस्था व हिंदू जनजागरण समितीनेच त्यांची हत्या केली, असा खळबळजनक दावा आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांनी केला आहे.गोव्यातील बॉम्बस्फोटप्रकरणी आधीपासूनच राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) रडारवर असलेल्या सारंग आकोलकरच्या पुण्यातील घरासह पनवेलमधील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि देवद आश्रमामध्ये सीबीआयने छापे टाकून घराची झडती घेतली. अकोलकरच्या घरामधून वर्तमानपत्रांची कात्रणे, वीजबिल, जुने बँक पासबुक आणि काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत, तर डॉ. तावडेंचा लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दोन्ही ठिकाणी सकाळी सात वाजता सुरू करण्यात आलेली ही झडती दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती. आॅगस्ट २०१३ मध्ये विवेकवादी विचारवंत दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांना तपासात फारशी प्रगती साधता आली नव्हती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे तपास सोपविला होता. कट्टर हिंदुत्ववादी आणि उजव्या विचारसरणीची संघटना म्हणून सनातन संस्थेची ओळख असून गोव्यातील पोंडा येथे मुख्यालय आहे. दाभोलकर यांच्या हत्याकांडातील मुख्य कटकर्ता म्हणून आकोलकरवर संशय व्यक्त होत असतानाच एनआयएच्या तपासातही त्याचे नाव समोर आल्याने त्याच्यासह सनातनचे अनेक सदस्य भूमिगत झाले आहेत. दाभोलकरांची हत्या झाल्यापासून सनातन संस्थेकडे संशयाची सुई फिरत होती. सीबीआयलाही मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी असलेल्या सारंग अकोलकर आणि रुद्रगौडा पाटील या दोघांवर संशय आहे. सीबीआयने संशयितांची काढलेल्या रेखाचित्रांचे अकोलकर आणि रुद्रगौडा पाटीलच्या चेहऱ्यांशी साम्य आहे. त्यादिशेने तपास करताना मिळालेल्या काही दुव्यांच्या आधारे सीबीआयने अकोलकरच्या पुण्यातील घरी छापा टाकून झडती घेतली. सीबीआयच्या मुंबईहून आलेल्या पथकामध्ये तपास अधिकारी तथा अधीक्षक एस. आर. सिंग यांच्यासह आठजण होते. त्यांनी पंचही सोबतच आणलेले होते. सीबीआयच्या दोन पथकांनी पनवेलमध्ये दोन ठिकाणी छापे टाकले.पनवेलमधील देवद येथील सनातनच्या आश्रमामध्ये १२ जणांचे एक पथक चौकशीसाठी गेले होते. तर दुसऱ्या पथकाने कल्पतरु सोसायटीमधील डॉ. वीरेंद्रसिंग तावडे यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. दोन्ही ठिकाणी झडती घेण्यात आली. सनातनच्या आश्रमातील साधकांकडे चौकशी करण्यात आली असून डॉ. तावडे यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केल्याची माहिती सुत्रांनी दिली. पूर्ण नाव सारंग दिलीप अकोलकर (वय ३०, रा. डी विंग, डीएसके चिंतामणी, शनिवार पेठ) असे आहे. बाजीराव रस्त्यावरच्या नू.म.वि. शाळेमध्ये शालेय शिक्षण घेतलेल्या सारंगने आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे, तर त्याने भारती विद्यापीठामधून २००३ मध्ये ‘इलेक्ट्रिक इंजिनीअरिंग’ची पदवी घेतलेली आहे. सनातन संस्थेचा तो पूर्णवेळ साधक आहे. गोव्यातील मडगावमध्ये २००९ साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर अकोलकर फरार झाला असून, तपास यंत्रणा मागावर आहेत....तरीही शोध नाहीएनआयएने २०१२ मध्ये अकोलकरला पकडण्यासाठी इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीस जारी करूनही त्याचा छडा लालेला नाही. त्याच्याशी संबंधित ठिकाणांवरील धाडसत्र सुरूच असल्याचे सीबीआय सूत्रांनी सांगितले. पूर्वनियोजित षड्यंत्र‘आप’चे आशिष खेतान सीबीआयच्या कारवाईपूर्वी टिष्ट्वट करतात आणि मग कारवाई होते, हे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे. आशिष खेतानच्या तालावर सीबीआय काम करते, असा आरोप सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरच ‘सीबीआय’ सक्रिय झाली. उशिराने का होईना, त्यांनी काहीतरी कृती केली आहे. - डॉ. मेघा पानसरेआशीष खेतानला धडा शिकवूसनातनवर आरोप करणाऱ्या आशीष खेतान यांना धडा शिकवू, अशी गर्भीत धमकी संजीव पुनाळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र, पत्रकारांनी ‘धमकी’चे गांभिर्य लक्षात आणून देताच ‘आशीष खेतान यांना सनदशीर मार्गाने धडा शिकवू’, अशी सारवासारव पुनाळेकर यांनी केली.