पुणो : महाराष्ट्र अंधश्रद्धा निमरूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी हत्या झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यात गुन्हे शाखा अपयशी ठरली. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत उच्च न्यायालयाने हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे तपासात काहीतरी प्रगती होईल अशी आशा निर्माण झाली खरी; परंतु सीबीआयच्या कूर्मगतीने चालणा:या तपासामुळे तसेच नुकत्याच सतीश शेट्टी खूनप्रकरणात दाखल केलेल्या ‘क्लोजर’ रिपोर्टमुळे तपास लागेल की नाही याबाबत धास्तीही निर्माण झाली आहे.
पुणो शहर पोलीस हत्येच्या पहिल्या दिवसापासूनच तपासाला लागले होते. परंतु सुरुवातीपासूनच तपासाची दिशा निश्चित करण्यात आणि कोणत्याही एका निष्कर्षाप्रत येण्यात पोलीस कमी पडल्याचे पदोपदी जाणवत होते. मुळात पोलीसच या घटनेमुळे हादरून गेलेले होते. घटनास्थळावर सर्वात आधी दाखल झालेल्या अधिकारी आणि कर्मचा:यांनाच मुळात दाभोलकरांची ओळख पटू शकलेली नव्हती. ज्या चौकीसमोर मारेक:यांनी दुचाकी उभी केली होती; त्या चौकीच्या दाराला कडी घातलेली होती. शेजारी लावण्यात आलेल्या नाकाबंदी पॉइंटवर एकही कर्मचारी हजर नव्हता. जर अधिका:यांनी घटनेनंतरच्या पहिल्या तासाभरात शहरात नाकाबंदी, वाहन तपासणी सुरूकेली असती तर कदाचित हल्लेखोर सापडू शकले असते. परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. पोलिसांच्या भाषेत पहिला तास म्हणजे ‘गोल्डन अवर’ असतो. या तासाभरात जर पोलिसांनी वेगवान हालचाली केल्या असत्या तर आज चित्र वेगळे दिसले असते. परंतु दाभोलकरांची ओळख पटवायला उशीर लावणा:या आणि त्यानंतर कोणतीही उपाययोजना न करणा:या अधिका:यांवर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही हे कोडे न उलगडणारे आहे.
मुळात पुणो पोलिसांची अवस्था भर समुद्रात दिशा चुकलेल्या जहाजासारखी झाली होती. दाभोलकरांच्या हत्येमुळे हादरलेल्या पोलिसांना नेमके काय करावे हेच सुधरत नव्हते. सामाजिक, राजकीय दबावामुळे पोलिसांनी मिळेल त्या दिशेला तपासाला सुरुवात केली. नेमकी त्याच दिवशी मनीष ऊर्फ मन्या नागोरी (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) आणि विकास रामअवतार खंडेलवाल (रा. इचलकरंजी, कोल्हापूर) या दोघांना गुन्हे शाखेने दहशतवाद विरोधी पथकाकडून वर्ग करून घेतले. थेट दाभोलकरांच्या हत्येच्या तपासामध्ये त्यांना अटक करणो घाईचे आणि कोणत्याही पुराव्याशिवाय केलेली अटक अशा स्वरूपाचे ठरले असते. त्यामुळे पोलिसांनी शक्कल लढवीत पुणो विद्यापीठातील रखवालदार प्रल्हाद जोगदनकर यांच्या खूनप्रकरणात त्यांना अटक दाखवली.
न्यायालयाकडून त्यांची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्यात आला. परंतु पोलीस कोठडीच्या मुदतीतही काहीच हाती लागू न शकल्यामुळे या दोघांना हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या अज्ञात व्यक्तीच्या खूनप्रकरणामध्ये अटक केली. नागोरी आणि खंडेलवालकडे बराच काळ तपास करूनही काहीच ठोस हाती लागत नाही म्हटल्यावर बॅलेस्टिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी या दोघांना दाभोलकरांच्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक केली.
प्लॅँचेट मानगुटीवर
दाभोलकरांच्या हत्येच्या तपासामध्ये हिंदुत्ववादी कार्यकत्र्यासोबत काही जोतिषी, भोंदूबाबा आणि राशी-खडेवाल्यांची चौकशीही होत होती. त्याच वेळी नेमकी ज्योतिषांची या तपासात मदत घेतली जात असल्याची चर्चाही पोलीस आयुक्तालयामध्ये रंगत होती. परंतु पत्रकार आशिष खेतान यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांनी दाभोलकरांच्या तपासासाठी ‘प्लॅंचेट’ केल्याचे उघड झाले. तपासासाठी मदत घेण्यात आलेल्या काही माजी पोलीस अधिका:यांपैकी निवृत्त सहायक आयुक्त रणजित पांडुरंग अभिनकर आणि निवृत्त पोलीस कर्मचारी मनीष ठाकूर यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या संमतीने प्लॅंचेट केल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. खेतान यांनी याबाबतीत ‘आऊटलुक’मध्ये एक सविस्तर लेख लिहिला होता. त्यावर आक्षेप घेत पोळ यांनी खेतान यांना नोटीसही बजावली होती. परंतु दाभोलकरांचा आत्मा अंगात घुसून घटना कथन करत असल्याचा दिखावा करतानाचा ठाकूरचा व्हिडिओ आणि पोळ यांची स्पष्टोक्ती असलेला व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे शेवटी ‘दूध का दूध और पानी का पानी’ झाले. याप्रकरणाच्या तपासाचेही आदेश गृहमंत्रलयाने दिले आहेत. परंतु प्लॅंचेट प्रकरणाचा तपास तरी ‘डोळसपणो’ लागणार का, हाच खरा प्रश्न आहे.
पोलिसांच्या पावलावर पाऊल
सीबीआयने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस गुन्ह्याची व्याप्ती, स्वरूप आणि कागदपत्रंची माहिती घेण्यातच घालवले. त्यानंतर घटनास्थळाला भेट देऊन सीबीआयने तपासाला प्रत्यक्ष सुरुवात केली. परंतु सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप तरी कोणतीही प्रगती झालेली नाही. पुणो पोलिसांनी केलेल्या तपासाचेच अवलोकन अद्याप सुरू आहे. यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का, याचा शोध घेत असलेल्या सीबीआयलाही तपास लावण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत हे स्पष्टच आहे.
पोलिसांना प्रश्न विचारता येत होते, सीबीआयला नाही
हमीद व मुक्ता दाभोलकर तसेच अंनिसच्या कार्यकत्र्यानी हा तपास पुणो पोलिसांकडेच ठेवण्याची मागणी वारंवार केली होती. किमान पोलिसांना तपासाबाबत माहिती विचारणो, प्रश्न करणो शक्य होते. परंतु सीबीआयकडे तपास गेल्यावर सीबीआयला प्रश्न विचारणो आणि माहिती विचारणो अवघड होणार आहे. त्यामुळे तपास नेमका कुठल्या दिशेने आणि कुठर्पयत पोचला आहे याची माहिती कार्यकत्र्याना कशी मिळणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
तपासादरम्यानची तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भूमिका तितकीशी कठोर आणि खमकी अशी नव्हती. त्यामुळेच कदाचित तपासाबाबत काही काळाने पोलिसांमध्ये ढिलाई आली. दाभोलकरांच्या हत्येचा तपास आपल्या हातातून निसटला असल्याची जाणीव होऊ लागल्यानंतर काही अधिका:यांना तपास सीबीआय किंवा सीआयडीकडे गेल्याची स्वप्ने पडू लागली होती. तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथक (एसआयटी)च्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या बैठका झाल्या असतील, तोच हा तपास सीबीआयकडे गेला.
प्रश्न अजूनही अनुत्तरित
4दाभोलकरांवर झाडण्यात आलेल्या गोळ्या या दोघांनी विकलेल्या पिस्तुलातूनच झाडण्यात आलेल्या होत्या. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालावरून ही बाब स्पष्ट झाल्यानंतर करण्यात आलेली अटकही फार काळ टिकाव धरू शकली नाही.
4नागोरी आणि खंडेलवालला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. त्यामुळे पोलिसांचे सायास आणि कयास दोन्हीही उघडे पडले.
4नागोरी आणि खंडेलवाल एटीएसच्या ताब्यामध्ये असताना एटीएसने तब्बल 47 पिस्तुले जप्त केली होती. यातीलच एका पिस्तुलातून दाभोलकरांवर गोळ्या झाडण्यात आल्याचे निष्पन्न झाले खरे; परंतु हे पिस्तूल कोणाला विकण्यात आले होते हे मात्र शेवटर्पयत कळू शकले नाही.
4एटीएस आणि पुणो पोलीस यांना या पिस्तुलाचा मालक कसा सापडला नाही हा प्रश्न अजुनही अनुत्तरितच आहे. त्यामुळे नागोरी आणि खंडेलवालची अटक हे केवळ उभे केलेले नाटय़ होते की त्यामागे खरोखरीच काही ‘थिअरी’ होती हा संशोधनाचा विषय आहे.