शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘सीबीआय, सीआयडीने एकत्रित तपास करावा’

By admin | Updated: March 18, 2017 02:42 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी प्रामाणिकपणे व एकत्रितपणे तपास करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआय व सीआयडीला केली.

- दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी प्रामाणिकपणे व एकत्रितपणे तपास करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआय व सीआयडीला केली.दोन्ही तपास यंत्रणांनी शुक्रवारी न्या. एस.सी. धर्माधिकारी व न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे तपास अहवाल सादर केला. हा अहवाल वाचत खंडपीठाने म्हटले की, तपास यंत्रणांनी आरोपींना पकडण्यासाठी मेहनत घेतली आहे. या दोन्ही केसमधील आरोपी सारखेच आहेत. हे सर्व आरोपी उजव्या जहालवादी गटाचे आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यासाठी दोन्ही तपास यंत्रणांनी एकत्रित व प्रामाणिकपणे काम करणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने म्हटले. ‘पुढील तपासामध्ये दोन्ही तपास यंत्रणा एकत्रित काम करतील, असे आमचे मत आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता दोन्ही तपास यंत्रणा कसून तपास करतील, अशी अपेक्षा आम्हाला आहे. या तपासातून भविष्यात काहीतरी भक्कम (पुरावे) बाहेर यावे, अशी आम्ही अपेक्षा करतो. तपास करताना काळजीपूर्वक करा. फरार आरोपींना मदत होईल, अशी कोणतीही चूक करू नका,’ असे खंडपीठाने तपास यंत्रणांना सावध करताना म्हटले. (प्रतिनिधी)