शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीवर कोट्यवधींची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 01:27 IST

दहीहंडीकडे मंडळाकडे आकर्षित करण्यासाठी आयोजक नेत्यांची धावपळ आणि त्यातून झालेला कोट्यवधींचा खर्च याची चर्चा शहरात होती.

पिंपरी : महापालिकेच्या जवळ आलेल्या निवडणुका, सेलिबे्रटींना आणण्यासाठी मंडळांची चढाओढ, तसेच विभागातील नागरिकांना दहीहंडीकडे मंडळाकडे आकर्षित करण्यासाठी आयोजक नेत्यांची धावपळ आणि त्यातून झालेला कोट्यवधींचा खर्च याची चर्चा शहरात होती. गेल्या वर्षी दुष्काळामुळे अनेक दहीहंडी उत्सव मंडळांनी उत्सव साजरा केला नव्हता़ यंदा मात्र मंडळांनी आठ दिवसांपासून सेलिबे्रटी, डीजे, विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते़ आगामी महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन उद्योगनगरीच्या राजकारणी मंडळींनी शहरात भरगच्च कार्यक्रम ठेवले होते़ दहीहंडीची चर्चा झाली पाहिजे यासाठी कितीही पैसे खर्च झाले तरी चालेल यासाठी पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सूचना देऊन पैशांची तजवीज केली होती़ नावाजलेला डीजे, प्रसिद्ध हिंदी आणि मराठी अभिनेत्री, दहीहंडी फ ोडण्यासाठी ठेवलेली बक्षीसाची मोठी रक्कम, दहीहंडी लावण्यासाठी उभी केलेली क्रेनचे भाडे, कार्यकर्त्यांचा खर्च, जाहिरात, बॅनर यामुळे एका दहीहंडीसाठी लाखोंची उधळण मंडळाच्यावतीने करण्यात आले़ विशेष म्हणजे सैराट चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू हिला आपल्याच कार्यक्रमासाठी थोडावेळ आणण्यासाठी अनेक मंडळांनी लाखोंची बोली लावली होती़ शहरात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव आयोजित केले होते़ त्यामुळे स्थानिक व्यवसायिकांसह अनेकांना फ ायदा झाला़ शहरात सर्वाधिक चर्चा होण्यासाठी लाखो रूपये भाडे देऊन डीजे मागविण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती़ दहीहंडी उत्सवासाठी मंडळांनी वर्गणीही चांगल्या प्रकारे जमा केली होती. सक्तीने वर्गणी मागण्याच्या घटना शहरात घडल्या. पोलिसांकडे अशा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हेही दाखल झाले. लाखो रूपये खर्च करण्यापेक्षा सामाजिक कार्यामध्ये दहीहंडीमंडळांनी सहभाग द्यावा़ तसेच त्यांनी नागरिकांना मदत केल्यास सत्कारणी लागेल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती़