शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बंदमुळे मुंबईकरांची पायपीट

By admin | Updated: February 16, 2016 03:44 IST

मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून सोमवारी पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंद आंदोलनामुळे मुंबई उपनगरवासीयांना मोठे हाल सोसावे लागले. मुंबईकरांना मोठी पायपीट करावी लागली.

मुंबई : मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून सोमवारी पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंद आंदोलनामुळे मुंबई उपनगरवासीयांना मोठे हाल सोसावे लागले. मुंबईकरांना मोठी पायपीट करावी लागली. संपामुळे बेस्ट बसेसमध्येही मोठी गर्दी झाली होती. बीकेसी येथील ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला तर कुर्ला आणि वांद्रे येथून पोहोचण्यासाठी अनेकांना बरीच कसरत करावी लागली. रिक्षा बंद करूनही मागण्यांवर परिवहन विभागाकडून निर्णय घेण्यात न आल्याने आगामी तीन दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती युनियनकडून देण्यात आली. मुंबईत ओला, उबर, टॅक्सी फॉर शुअरसारख्या कंपन्या प्रवाशांची अवैध वाहतूक करत आहेत. त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, या मागणीसह अनेक मागण्या युनियनकडून करण्यात आल्या होत्या. त्यासाठी सोमवारी रिक्षा बंदची हाक देण्यात आली. त्यानुसार जवळपास ८३ हजार रिक्षा बंदमध्ये सामील होतील, असे युनियनकडून स्पष्ट करण्यात आले होते. या बंदमध्ये काही प्रमाणात रिक्षाचालक सामील झाले. मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला तर वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली परिसरात बऱ्यापैकी रिक्षा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना स्थानक गाठण्यासाठी पायपीट करण्याशिवाय पर्याय नव्हता. शाळेत पोहोचण्यासाठी पालकांना मुलांसह बरीच कसरत करावी लागली. याच भागांमध्ये अन्य युनियनकडून रिक्षा सुरू ठेवण्यात आल्याने थोडीफार मदत स्थानिकांना मिळत होती. तर खासगी बसद्वारेही प्रवाशांची वाहतूक सुरू होती. काही रेल्वे स्थानकांबाहेर असणाऱ्या शेअर रिक्षाही पोलीस संरक्षणात सुरू ठेवण्यात आल्याने स्थानकाबाहेर येताच प्रवासी पटकन रिक्षा पकडताना दिसत होते. संध्याकाळी सहानंतर तरी रिक्षा सुरू होतील, अशी आशा बाळगणाऱ्या उपनगरवासीयांची ही आशा फोल ठरली. युनियनकडून परिवहन आयुक्तांकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मात्र हे निवेदन सादर केल्यानंतरही त्यावर ठोस निर्णय न झाल्याने मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पुढील आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)