शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

पोटच्या पोरांनी हाकललं, स्मशानभूमीनं सांभाळलं

By admin | Updated: March 10, 2016 00:57 IST

पोटच्या पोरांनी घरातून हाकललं...चालता येत होतं तोपर्यंत मी पोराच्या घरी जायचो; पण फक्त आईच्या फोटोला पाया पडायला...आता पाय मोडल्यापासून तिथंही जाऊ शकत नाही. आता जगू वाटत नाही.

रविकिरण सासवडे, बारामतीबारामती : पोटच्या पोरांनी घरातून हाकललं...चालता येत होतं तोपर्यंत मी पोराच्या घरी जायचो; पण फक्त आईच्या फोटोला पाया पडायला...आता पाय मोडल्यापासून तिथंही जाऊ शकत नाही. आता जगू वाटत नाही.. आपल्या नशिबाला दोष द्यायचा दुसरं काय?... अशा शब्दांत उत्तरआयुष्यातील हालाखीची हृदयद्रावक व्यथा मांडली आहे. गुणवडी (ता. बारामती) येथील स्मशानभूमीचा आसरा घेतलेल्या वृद्ध दाम्पत्याने... पाणावलेले डोळे अन् थरथरणारे शब्द हालाखीचं जीणं मांडण्यासाठी पुरेसे होते. जन्म दिलेल्या रक्ताच्या नात्यांनीच म्हातारपणी ओझे नको म्हणून वृद्ध माता-पित्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला. वृद्ध भागुजी आगवणे त्यांचा खुबा मोडल्याने जायबंदी अवस्थेत स्मशानभूमीलगत पडून आहेत. या अवस्थेत वृद्धत्वानेच खचलेली त्यांची पत्नी सुभद्रा आगवणे या त्यांना भीक मागून जगवत आहेत. त्यातही या दु:खात भरीस भर म्हणून सुभद्रा या मूकबधिर आहेत. हे दाम्पत्य मूळचे गुणवडीचे आहे. भागुजी यांना दोन मुले आहेत. दोन्ही मुलांना त्यांनी शिक्षण देऊन जगण्यासाठी सक्षम केले. त्यापैकी एकजण गृहरक्षक दलात नोकरीला आहे, तर दुसरा मुलगा व्यसनाधीन आहे. दोघेही वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्यासाठी टाळाटाळ करतात. >> खाकी वर्दीतली माणुसकी या दाम्पत्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन येथे पोहोचले. पोटच्या पोरांचा अमानुषपणा अनुभवल्यानंतर पोलिसांतील माणुसकी त्यांनी अनुभवली. पोलिसांनी स्वत:च परिसराची साफसफाई करून, त्यांना राहण्यासाठी जागा करून दिली. उजेडासाठी विजेचा दिवा लावून दिला, तर गावातील तरुणांनी या दाम्पत्याला आधार दिला आहे. येथील तरुण लहानपणापासून दाम्पत्याला ओळखतात. ‘नाना’ म्हणून भागुजी गावात प्रसिद्ध आहेत. या नाना-नानींची देखभाल तरुण करतात. पोटच्या मुलांनी नाकारल्यानंतर माणुसकीच्या नात्यातून गावातील तरुणांनी जोडलेले भावबंद गहिवर आणतात. >>व्यसनी मुलालादिला चोपभागुजी आगवणे यांचा धाकटा मुलगा व्यसनाधीन आहे. त्याने स्मशानभूमीत येऊन भागुजी यांच्याशी वाद घातला. शिवीगाळही केली. या वेळी गावातील तरुणांनी तिथे धाव घेतली. त्या व्यसनी मुलाला चोप दिला. असे पाणावल्या डोळ्यांनी भागुजी यांनी सांगितले.