शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा विभाग करणार शेतकऱ्यांची वर्गवारी

By admin | Updated: March 25, 2016 02:22 IST

शेतकऱ्यांकडे १३ हजार ५०० कोटींची थकबाकी असून वसुली सुरू केल्यास पुन्हा वाद होतील. शेतकऱ्यांची निर्यातदार, अल्पभूधारक, बागायतदार अशी वर्गवारी करावी व त्यानुसार

मुंबई : शेतकऱ्यांकडे १३ हजार ५०० कोटींची थकबाकी असून वसुली सुरू केल्यास पुन्हा वाद होतील. शेतकऱ्यांची निर्यातदार, अल्पभूधारक, बागायतदार अशी वर्गवारी करावी व त्यानुसार विजेचे दर आकारावे अशी सूचना एमईआरसीने केली आहे. या सूचनेनुसार वर्गवारी करण्यासाठी समिती नेमली जाईल, असेही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. विरोधी पक्षातर्फे नियम २९३ अन्वये ऊर्जा विभागावरील चर्चा उपस्थित केली होती. या प्रस्तावाला उत्तर देताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी वीज कंपन्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवरील वीज वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी विभागस्तरावर सहव्यवस्थापकीय संचालक नेमले जातील, अशी घोषणा केली. विदर्भ, मराठवाडा-उत्तर महाराष्ट्र, पुणे, मुंबई-कोकणला स्वतंत्र सहव्यवस्थापकीय संचालक मिळेल. १५ आॅगस्ट २०१६ पूर्वी सर्व विभागांची पुनर्रचना केली जाईल. यातून कंपन्यांची कार्यक्षमता वाढली असे निदर्शनास आले तर पुढे विभागनिहाय कामाची विभागणी करण्याचाही विचार केला जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. ओपन अ‍ॅक्सेसमध्ये जाणाऱ्या उद्योगांवर करबरेच उद्योग महावितरणकडून वीज न घेता ओपन अ‍ॅक्सेसमधून वीज खरेदी करत आहेत. ओपन अ‍ॅक्सेसमधून वीज खरेदी करताना उद्योग कर लागत नाही. यापुढे जो महावितरण सोडेल व ओपन एक्सेसध्ये जाईल अशा उद्योगांवर इंडस्ट्री ड्युटी लावली जाईल. यासाठी लवकरच कायदा तयार केला जाईल, असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.