शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

मांजरीचा माकडिणीला लागला लळा; पुरूषांसोबत जडली मैत्री तर महिलांशी वैर

By azhar.sheikh | Updated: October 4, 2017 18:04 IST

माकड हा संरक्षित वन्यजीव असल्यामुळे त्याला पाळण्याच्या हेतूनेही घरी ठेवणे कायद्याने गुन्हा ठरतो. वेळुंजेचा पाहुणचार घेणारी माकडिणदेखील अशीच कोणाच्या तरी घरी लहानपणापासून असावी व त्याचा सांभाळ क रणाºया व्यक्तीने तिला मोठी झाल्यावर सोडून दिले असावे, असा अंदाज वनविभागाने वर्तविला

ठळक मुद्देमाकडिणीला चक्क गावातील मांजरीच्या पिल्लाचा लळा लागला असून माकड-मांजरीचे अनोखे प्रेम पहिल्यांदाच बघून गावकरी अवाक् झालेया माकडिणीचे महिलांशी मोठे वैर असल्याचे चित्र गावात पहावयास मिळते. यामुळे येथील महिलांनी या ‘पाहुणी’चा चांगलाच धसका घेतला आहे.

नाशिक :  माकड गावात किंवा शहरात येणे नवीन नाही; मात्र त्र्यंबकेश्वरपासून दहा किलोमीटरवर असलेल्या वेळुंजे गावात पाहुणी आलेल्या माकडिणीचा स्वभाव जरा अजबच आहे. माकडिणीला चक्क गावातील मांजरीच्या पिल्लाचा लळा लागला असून माकड-मांजरीचे अनोखे प्रेम पहिल्यांदाच बघून गावकरी अवाक् झाले आहे; मात्र या माकडिणीचे महिलांशी मोठे वैर असल्याचे चित्र गावात पहावयास मिळते. यामुळे येथील महिलांनी या ‘पाहुणी’चा चांगलाच धसका घेतला आहे.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रम्हगिरी, अंजनेरी पर्वतरांग माकडांच्या वास्तव्यासाठी प्रसिध्द आहे. या भागातील नागरिकांची या दोन्ही डोंगरांवर कायम ये-जा असल्याने अनेकदा काही आदिवासी प्रेमापोटी माकडांचे लहान पिल्लू पाळण्यासाठी घरी घेऊन येतात; मात्र माकड हा संरक्षित वन्यजीव असल्यामुळे त्याला पाळण्याच्या हेतूनेही घरी ठेवणे कायद्याने गुन्हा ठरतो.

वेळुंजेचा पाहुणचार घेणारी माकडिणदेखील अशीच कोणाच्या तरी घरी लहानपणापासून असावी व त्याचा सांभाळ क रणाºया व्यक्तीने तिला मोठी झाल्यावर सोडून दिले असावे, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. कारण ही माकडिण वेळुंजेमधील मानवी वस्तीतून जंगलात जाण्यासाठी तयार नाही. ती येथील मुले, माणसांच्या अंगखांद्यावर खेळताना दिसून येते. पंधरवड्यास तिला मांजरीच्या लहान पिल्लाचाही लळा लागला आहे.

या गावात त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्राच्या अधिकाºयांनी बुधवारी (दि.४) भेट दिली. येत्या दोन दिवसांत माकडिणीला ताब्यात घेतले जाणार असल्याचे परिक्षेत्र अधिकारी कैलास आहिरे यांनी सांगितले.