शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सीमा भागातील विद्यार्थ्यांना कर्नाटकच्या सीईटीचे बंधन

By admin | Updated: March 8, 2016 02:41 IST

महाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील विद्यार्थ्यांनी चालू वर्षासाठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी २०१६) देऊ नये़ त्याऐवजी कर्नाटक राज्याची सीईटी द्यावी

धर्मराज हल्लाळे, नांदेडमहाराष्ट्र-कर्नाटक वादग्रस्त सीमा भागातील विद्यार्थ्यांनी चालू वर्षासाठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा (एमएचटी-सीईटी २०१६) देऊ नये़ त्याऐवजी कर्नाटक राज्याची सीईटी द्यावी, असा तुघलकी आदेश कर्नाटकच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने दिला आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा सीमा भागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे़मेडिकल सीईटी ५ मे रोजी होत असून त्यासाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी २२ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज भरू शकतात़ सीमा भागातील विद्यार्थ्यांनी कर्नाटक आरोग्यविज्ञान अभ्यासक्रमाची सीईटी द्यावी, त्यानंतर गुणवत्तेच्या आधारावर पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील एमकेबी (महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्युटेड बॉर्डर) कोट्यातील आरक्षित जागांवर गुणवत्तेप्रमाणे प्रवेश दिला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिसूचनेत म्हटले आहे़ जवळपास ८६५ गावांतील मराठी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे़ महाराष्ट्रात १२वी बोर्डाचा अभ्यासक्रम तर कर्नाटकमध्ये एनसीईआरटीचा ११वी व १२वी या दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रम मेडिकल सीईटीसाठी आहे़ हा बदल विद्यार्थ्यांनी स्वीकारलाही असता, परंतु त्यांना पुरेसा वेळ देण्यात आलेला नाही़ प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपलेली असताना कर्नाटकाची परीक्षा कशी द्यायची तसेच दोन महिन्यांवर परीक्षा आली असताना वेगळा अभ्यास कसा पूर्ण करायचा, असे अनेक प्रश्न सीमा भागातील विद्यार्थ्यांना पडले आहेत़ वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने सीमा भागातील विद्यार्थ्यांना कर्नाटकात जाऊन परीक्षा देण्याचा सल्ला दिला असून सर्वकाही १५ दिवसांत घडणार असल्याने विद्यार्थ्यांना न्यायालयाशिवाय पर्याय उरलेला नाही़