शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी समितीचे वाभाडे

By admin | Updated: February 26, 2017 01:57 IST

जातीची पडताळणी करून घेण्यासाठी आपल्यापुढे येणारा प्रत्येक अर्जदार हा खऱ्या आदिवासींचे आरक्षणाचे फायदे लुबाडू पाहणारा तोतया आहे, असा पूर्वग्रह मनात ठेवून आणि असा प्रत्येक

- अजित गोगटे, मुंबईजातीची पडताळणी करून घेण्यासाठी आपल्यापुढे येणारा प्रत्येक अर्जदार हा खऱ्या आदिवासींचे आरक्षणाचे फायदे लुबाडू पाहणारा तोतया आहे, असा पूर्वग्रह मनात ठेवून आणि असा प्रत्येक प्रयत्न आपल्याला हाणून पाडायचा आहे, असे ठरवून ‘झापडबंद’ पद्धतीने काम करणाऱ्या आदिवासींच्या कोकण विभागीय जात पडताळणी समितीवर उच्च न्यायालयाने न भूतो अशा कडक शब्दांत ताशेरे मारले आहेत.आपल्यापुढील प्रकरण ही जणू अर्जदार आणि आपल्यातील लढाई आहे अशा आविर्भावात काम करणाऱ्या समितीने जमिनीवर यावे आणि डोळे उघडे ठेवून काम करावे, असा उपरोधिक सल्लाही न्यायालयाने दिला आहे.भारतीय अन्न महामंडळातून डेपो मॅनेजर पदावरून दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले जयराम विश्राम गंगावणे यांचा ‘ठाकर’ या आदिवासी जातीचा दावा अमान्य करण्याचा समितीचा निर्णय रद्द करताना न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने समितीचे वाभाडे काढले.समितीने गंगावणे यांचा जातीचा दावा फेटाळल्यानंतर अन्न महामंडळाने त्यांचे प्रॉ.फंड, ग्रॅच्युईटी, शिल्लक रजेचा पगार यासारखे निवृत्तीलाभही रोखून ठेवले होते. समितीने गंगावणे यांना एक आठवड्यात जात पडताळणी दाखला द्यावा आणि तो सादर केल्यावर अन्न महामंडळाने त्यांना रोखलेले निवृत्तीलाभ दोन आठवड्यांत अदा करावे, असा आदेशही खंडपीठाने दिला. गंगावणे यांनी आपल्या जातीच्या दाव्यासोबत त्यांची सख्खी पुतणी आणि पुतण्या या दोन रक्ताच्या नातेवाईकांना समितीने दिलेले पडताळणी दाखले सादर केले होते. परंतु ते दुर्लक्षित करून समितीने गंगावणे आपली ‘ठाकर’ ही जमात सिद्ध करू शकले नाहीत, असा निष्कर्ष काढून समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला खोटा ठरवून रद्द केला. याचे समर्थन करताना समितीने आपल्या निकालपत्रात उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे दाखले दिले. एवढेच नव्हे तर या निकालांनंतर रक्ताच्या नातेवाईकांचे जातीचे दाखले सादर करणाऱ्या अर्जदारांचे दावे पडताळण्याच्या कायद्यात आता कसा आमुलाग्र बदल झाला आहे, याचेही विवेचन केले होते.याचा संदर्भ देत खंडपीठाने म्हटले की, निदान आम्हाला कायदा शिकविण्याचे आणि त्यासाठी आमच्याच पूर्वीच्या निकालपत्रांमधील परिच्छेदच्या परिच्छेद उद््धृत करण्याचे उद्योग समितीने बंद करावेत. न्या. धर्माधिकारी हे एरवी निकालपत्रात कडक भाषा वापरत नाहीत. परंतु केवळ गंगावणे यांच्याच नव्हे तर इतरही अनेक प्रकरणांत समिती अशाच झापडबंद पद्धतीने काम करीत असल्याचे दिसून आले. शिवाय समितीचा निकाल उच्च न्यायालयात रद्द झाला तर सरकार किंवा संबंधित कर्मचाऱ्याचे कार्यालय अपिलात न जाता समितीच त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जात असते, असेही लक्षात आले. त्यामुळे या वैधानिक समितीस ताळ््यावर आणण्यासाठी आपल्याला नाईलाजाने कडक भाषा वापरावी लागत आहे, असे त्यांनी निकलपत्रात आवर्जून नमूद केले. या सुनावणीत गंगावणे यांच्यासाठी अ‍ॅड. आर. के. मेंदाडकर यांनी तर सरकार व समितीसाठी सहाय्यक सरकारी वकील पी. जी. सावंत यांनी काम पाहिले. समितीच्या अकलेची लक्तरेगंगावणे यांनी सादर केलेल्या त्यांच्या आजाबांच्या शाळेच्या दाखल्यात ‘ठाकर’ या जातीचा उल्लेख नाही, या समितीच्या भाष्याच्या संदर्भात समिती सदस्यांच्या अकलेचे वाभाडे काढत न्यायालयाने म्हटले की, हा दाखला सन १९२१ चा आहे व भारतीय राज्यघटना व त्या अनुषंगाने केलेल्या आरक्षणाच्या तरतुदी या त्यानंतरच्या घटना आहेत. त्यामुळे १९२१ मध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाने भविष्यात पाहून विद्यार्थ्याच्या दाखल्यात त्याची ‘ठाकर’ ही जात लिहावी, अशी अपेक्षा समिती कशी काय ठेवू शकते?