शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचारग्रस्त विद्यार्थिनींच्या नातेवाईकांपुढे जात पंचायतीचा पेच!

By admin | Updated: November 18, 2016 19:12 IST

तालुक्यातील पाळा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या लैगिंक शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत/अनिल गवई
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 18 - तालुक्यातील पाळा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनींच्या  लैगिंक शोषणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या पीडित विद्यार्थींनीच्या कुटुंबीयांना जात पंचायतीचे पदाधिकारी भेट देत असून समाजात तक्रार देण्याची प्रथा नसल्याचे सांगत असल्याने पेच निर्माण झाला आहे.
खामगाव पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेत दोन विद्यार्थींनींच्या लैगिंक शोषणाचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे दोन वेगवेगळ्या तक्रारींवरून मुख्य आरोपी इत्तुंसिंग पवार याच्यासह १७ आरोपींविरोधात कारवाईचा फास आवळण्यात आला.  दरम्यान, राज्यभर गाजत असलेल्या या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान, नवनवीन सत्य उजेडात येत असतानाच, अत्याचार ग्रस्त विद्यार्थीनींच्या नातेवार्इंकांची जात पंचायतीकडून वेगळी चौकशी केली जात आहे. पोलिसात तक्रार देण्यापूर्वी जात पंचायतीसमोर सदर प्रकरण का आणले नाही?, आपल्या समाजात पोलिसात तक्रार करण्याची प्रथा नाही, यासह विविध प्रश्नांचा भडीमार केल्या जात असल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. याकरीता घटना उघडकीस आल्याच्या दिवसांपासून सातपुड्याच्या पर्वंत रांगेतील संबधीत समाजातील जात पंचायत पदाधिका-यांसह अमरावती जिल्ह्यातील जात पंचायतच्या काही पदाधिका-यांनी हलखेडा ता. मुक्ताईनगर येथे तळ ठोकल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 
मुलींच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करीत, विविध प्रश्नांच्या भडीमारातून  जात पंचायतीच्या पदाधिका-यांकडून अत्याचारग्रस्त चिमुकलीच्या नातेवाईकांची रात्री उशीरापर्यंत झोप खराब केल्या जात असल्याचे वास्तव हलखेडा आदिवासी पाड्यात आहे. जात पंचायतच्या पदाधिका-यांच्या या कृत्यांमुळे अत्याचार पिडीत दोन्ही विद्यार्थींनीच्या नातेवाईकांचे जगणे मुश्किल झाल्याचीही चर्चा परिसरात होत आहे.
 
हलखेड्यातील आदिवासी बांधवांकडून सात्वन!
सातपुड्याच्या पर्वंत रांगेतील विविध आदिवासी पाड्यातील जात पंचायत पदाधिका-यांसह, अमरावती जिल्ह्यातील जात पंचायत पदाधिका-यांकडून पिडीत विद्यार्थींनीच्या नातेवार्इंकासमोर ‘पेच’ निर्माण केल्या जात असताना हलखेडा आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांकडून सात्वंन केल्या जात आहे. सोबतच त्यांना धीर दिल्या जात असल्याची माहितीही चौकशीत समोर आली आहे.
 
घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेच्या तक्रारीबाबत हलखेडा येथील आदिवासी बांधवांकडून अत्याचारग्रस्त विद्यार्थीनीच्या नातेवार्इंकांवर कोणताही दबाव नाही. या कुटुंबांचे आम्ही समुपदेशन करतोय. जात पंचायतीच्या पदाधिका-यांच्या दबावाबाबत आपणाला माहिती नाही. शासनाने अत्याचार ग्रस्त विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना मदत करावी.
- बॅलीस्टरनी सती भोसले
माजी सरपंच, हलखेडा आदिवासी ग्राम.