शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतींना चाप

By admin | Updated: April 14, 2016 04:16 IST

सामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतींच्या माध्यमातून चुकीचे काम करणा-या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारे महाराष्ट्र

मुंबई : सामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी जात पंचायतींच्या माध्यमातून चुकीचे काम करणा-या व्यक्तींना तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असणारे महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण २०१६ हे विधेयक बुधवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. मात्र, या विधेयकामुळे जात पंचायतींच्या विधायक कामांना धक्का लागणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या पूर्वसंध्येला सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण विधेयक एकमताने मंजूर करून विधीमंडळाने बाबासाहेबांना अभिवादन केले. हे विधेयक राज्यात सामाजिक न्यायाची नवी पहाट आणेल, असा विश्वास दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)गावकी बसवून न्याय देण्यास आता प्रतिबंधया विधेयकातील तरतुदीनुसार एखादी व्यक्ती वा समूहावर सामाजिक बहिष्कार टाकणाऱ्यांना तीन वर्षे कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. जात पंचायत अथवा गावकी बसवून न्याय देण्यास आता कायद्याने प्रतिबंध करण्यात आला आहे. असे करणे हे मानवी हक्कांचे उल्लंघन मानले जाईल. जात पंचायतीने दंड सुनावणे, एखाद्याला वाळीत टाकणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. चांदगुडे यांचा लढा यशस्वीसामाजिक बहिष्काराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जात पंचायतींविरोधात लढा उभारला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक घटनांमधील आरोपींवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकमतने त्यांना महाराष्ट्रीयन आॅफ द ईयर पुरस्कारासाठी नामांकित केले होते. आजच्या विधेयकामुळे चांदगुडे यांच्या लढ्याला अखेर यश आले आहे.विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर विधान परिषदेत गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी हे विधेयक मांडले. जातपंचायतीच्या माध्यमातून बहिष्कार घालण्याचे ६४ गुन्हे पाच वर्षात दाखल झाले. रायगड जिल्ह्यात यासंदर्भात ६३३ आरोपींना अटक झाली. अशा प्रकारांना आळा घालण्यास हा कायदा करण्यात आला आहे. या प्रकरणांत न्यायालयाने ठोठावलेल्या दंडाची रक्कम पीडितांना देण्यात यावी, अशी सूचना काँग्रेसच्या शरद रणपिसे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली.लोकमतचा पाठपुरावारायगड, नाशिक, नगर आणि परभणी जिल्ह्यातील जात पंचायतींच्या अघोरी व अमानवीय शिक्षेसंदर्भात लोकमतने सातत्याने आवाज उठवून या प्रकरणांचा पाठपुरावा केला होता. विशेषत: रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्काराच्या घटनांना वाचा फोडून सरकारचे लक्ष वेधले होते.