शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कॅशलेस व्यवहार ४० टक्क्यांनी घटले

By admin | Updated: April 12, 2017 01:35 IST

रोखीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. अनेक बँका ई व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात

पुणे : रोखीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे. अनेक बँका ई व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत असल्याने, नागरिकदेखील हातचे राखूनच ई पेमेंट करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत दिसून आले. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या. त्या वेळी रोकडरहित व्यवहार करण्यासाठी सरकारने आवाहन केले होते. मात्र, रोख रक्कमेची उपलब्धता वाढताच ई व्यवहारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू झाली आहे. नोटाबंदीच्या काळात तब्बल दोन ते अडीच महिने सरासरी ८० टक्के व्यवहार हे नेट बँकिंग, क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून होत होते. हे प्रमाण आता सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. त्यातच विविध बँकांनी आपल्या व्यवहारांवर भरघोस शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक बँकांचे हे दर वेगवेगळे आहेत. हॉटेलिंग, पेट्रोल, कपडे अशा व्यवहारांनुसार दर आकारले जात आहेत. पट्रोलच्या प्रत्येक व्यवहारासाठी ६ ते १४ रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे नागरिकही व्यवहाराचा प्रकार आणि निकड या नुसार ई व्यवहारांना पसंती देत आहेत. विविध बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कर्जाचे दर जाहीर करतात. त्यासाठी विविध योजनाही असतात. याच बँकांनी ई व्यवहारांना चालना देण्यासाठी आम्ही किती शुल्क आकारतो, हे मात्र जाहीर केले जात नाही. कोणत्या बँकेमध्ये दर्शनी भागात अशा शुल्काचे दरपत्रक लावल्याचे आढळून येत नसल्याचा खातेदारांचा अनुभव आहे. सराफी व्यावसायिक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘सोन्या चांदीच्या खरेदीसाठी ३० टक्के व्यवहार ई पेमेंट, धनादेश याद्वारे होतात. यात सरासरी २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.’ मात्र, काही सराफी व्यावसायिकांनी १० टक्के व्यवहारही ई पेमेंटद्वारे होत नसल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)नोटाबंदीच्या काळात ८० टक्क्यांपर्यंत विविध कार्डद्वारे पैसे अदा केले जायचे. मात्र, आता ३० टक्केच व्यवहार कार्डद्वारे होत आहेत. आता पुन्हा रोखीनेच व्यवहार होत आहेत. विविध बँका ८ ते १४ रुपयापर्यंत एका व्यवहारामागे शुल्क आकारात आहेत. त्यामुळे नागरिक पुन्हा रोख व्यवहारांकडे वळत आहेत. - बाबा धुमाळ, अध्यक्ष आॅल इंडिया पेट्रोल अँड डीलर्स असोसिएशनकपडे खरेदीत पूर्वी ६५ टक्क्यांपर्यंत कार्डपेमेंट होते. त्यात आता ६५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कार्डपेमेंट वाढले असले, तरी नागरिक हातचे राखूनच खरेदी करताना दिसत आहेत. - दिनेश जैन, कपडे व्यापारी