शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेस सोसायटी’ आवश्यक

By admin | Updated: June 13, 2016 04:25 IST

पैसा जितका जास्त हाताळला जातो, तितकी अधिक जोखीम उत्पन्न होते.

पुणे : पैसा जितका जास्त हाताळला जातो, तितकी अधिक जोखीम उत्पन्न होते. त्यामुळे ‘कॅशलेस सोसायटी’ची निर्मिती आवश्यक असून नेट बँकिंग, क्रेडीट- डेबीट कार्ड, आरटीजीएस, मोबाइल अ‍ॅपद्वारे आर्थिक व्यवहार केल्यास काळ्या पैसा रोखण्यास मदत मिळेल. मात्र त्यासाठी आर्थिक साक्षरता निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले.लाईफ (लाईक-माईंडेड इनिशिएव्ह फॉर एम्पॉवरमेंट) संस्था आणि अर्थक्रांती जनसंसदतर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दीक्षित यांच्या हस्ते ‘लाइफ स्फूर्ती सन्मान २०१६’ देऊन गौरविण्यात आले. या वेळी उद्योजक सोपान कुंजीर, अर्थक्रांती जनसंसदचे प्रभाकर कोंढाळकर, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव कटके, दयानंद फडतरे, लाइफ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ओंकार कोंढाळकर आदी उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे रुप पालटणारे सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भरेकर व वैशाली दांगट यांना या वेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर जालना जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक ज्योतीप्रिया सिंह या पुरस्कारार्थी उपस्थित राहू शकल्या नाहीत. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सन्मान सोहळ्याचे यंदा द्वितीय वर्ष होते. यंदाही कार्यक्रमस्थळी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या वेळी चौत्राम पवार म्हणाले, वृक्षारोपणाच्या माध्यमातून गावासाठी काम करायला सुरुवात केल्यानंतर वनवासी कल्याण आश्रम आणि अन्य संस्थांच्या मदतीने ग्रामस्थांनी श्रमदानातून गाव फुलवले आहे. आसपासच्या ८५ गावांमध्ये स्मोकलेस चूल या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून येथील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या इंद्रायणी तांदळासह स्ट्रॉबेरीलाही मोठी मागणी आहे. (प्रतिनिधी)