शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
3
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
4
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
5
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
6
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
7
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
8
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
11
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
12
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
13
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
14
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
15
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
16
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
17
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
18
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा

विवाहितेवरील बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: May 30, 2016 02:33 IST

विवाहितेवर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपावरून गणेश माने या आरोपीविरूद्ध वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

ठाणे : विनयभंग करून मोबाइल फोनद्वारे केलेल्या चित्रिकरणाच्या आधारे ब्लॅकमेल करीत डोंबिवलीतील विवाहितेवर अनेकदा बलात्कार केल्याच्या आरोपावरून गणेश माने या आरोपीविरूद्ध वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. दीड वर्षांपूर्वी डोंबिवलीत राहाणारी महिला पती आणि मुलांसह जम्मू येथून परतत होते. एक्स्प्रेसमध्ये तिच्या कुटुंबीयांची गणेश माने याच्याशी ओळख झाली. महिलेचे कुटुंब आणि आरोपी मूळचे साताऱ्यातील असल्याने महिलेच्या पतीने मोबाइल नंबर त्याला दिला. एक्स्प्रेसमध्येच महिलेची मुलगी आईचा फोन घेऊन खेळत असता आरोपीने तो मोबाइल क्रमांकही टिपून घेतला. चुनाभट्टी येथे राहाणाऱ्या आरोपीने मुंबईत आल्यानंतर महिलेच्या पतीशी संपर्क ठेवला. त्यानंतर महिनाभराने पती नसताना आरोपी घरी आला आणि त्याने विनयभंग करीत त्याचे चित्रिकरण केले. विरोध केल्यानंतर निघून गेला. त्यानंतर मुलगी कर्करोगाने आजारी असल्याचे समजल्याने माने याने वैद्यकीय मदत मिळवून देतो, असे सांगून ठाण्याला बोलावले. त्याला नकार दिला असता विनयभंग केल्याची क्लीप आपल्याकडे असून ती तुझ्या पतीला दाखवेन, असे सांगून तो ब्लॅकमेल करू लागला, असे या महिलेच्या तक्रारीत म्हटले आहे. ब्लॅकमेल करण्याची धमकी देत लॉजमध्ये नेऊन बलात्कार केला. त्याचेही चित्रिकरण केल्याची तक्रार महिलेने केली. पोलिसांनी मानेविरूद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान आणखी एका युवतीने आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली. याबाबत राष्ट्रीय भ्रष्टाचार आणि अपराध निवारक परिषदेचे अध्यक्ष मोहन कृष्णन यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे या सेक्स स्कँडलच्या चौकशीची मागणी केली आहे.