शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी कन्हान नगर परिषदेच्या उपाध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: July 26, 2016 17:06 IST

सफाई कंत्राटदाराकडून एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी कन्हान नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २६ : सफाई कंत्राटदाराकडून एक लाखाची लाच मागितल्याप्रकरणी कन्हान नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.कन्हान शहरातील घानकचरा उचलणे आणि साफसफाई करण्याचे कंत्राट २०१५ मध्ये खलिद अंसारी यांना मिळाले होते. त्यांचे थकित बील काढून देण्याच्या बदल्यात नगर परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. पाठक यांनी एक लाखाची लाच मागितली होती.

अंसारी यांनी तशी तक्रार गेल्यावर्षी एसीबीकडे नोंदवली होती. तत्कालीन अधिका-यांनी सापळा रचून ९ आॅक्टोबर २०१५ ला सायंकाळी कन्हानच्या जयस्तंभ चौकात लाचेची रक्कम स्विकारताना डॉ. पाठक यांना पकडले होते. शहरातील भाजपाचे वजनदार प्रस्थ अशी ओळख असलेल्या पाठक यांनी त्यावेळी एसीबीच्या वरिष्ठांना आपली बाजू सांगून कारवाईचे बालंट टाळले होते.

त्यामुळे अंसारी यांनी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, सोमवारी रात्री एसीबीने पाठक यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वृत्त लिहिस्तोवर डॉ. पाठक यांना अटक झालेली नव्हती.