शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिला पत्रकारासह दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2017 03:30 IST

‘द क्विंट’ या वेबसाइटची पत्रकार पूनम अग्रवाल (रा़ दिल्ली) व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्यावर देवळाली

नाशिक : ‘द क्विंट’ या वेबसाइटची पत्रकार पूनम अग्रवाल (रा़ दिल्ली) व सेवानिवृत्त लष्करी अधिकारी दीपचंद यांच्यावर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सैन्य दलाचा जवान डीएस रॉय मॅथ्यू यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, लष्करी हद्दीत प्रवेश करून जवानांचे फोटो व व्हिडिओ क्लिप काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी आॅफिशियल सिक्रेट अ‍ॅक्टन्वये सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला़ अग्रवाल व दीपचंद यांनी फेब्रुवारीमध्ये बडीज ड्युटीच्या नावाखाली केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये मॅथ्यू यांनी लष्करी अधिकाऱ्यांकडून जवानांच्या पिळवणुकीबाबत तक्रार केली होती़ देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्टिलरी सेंटरमध्ये लान्स नायक डीएस रॉय मॅथ्यू हे २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते़ २ मार्च २०१७ रोजी त्यांचा गळफास घेतलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बराकीमध्ये सापडला. त्यानंतर तपासात पूनम अग्रवाल व दीपचंद यांनी कॅम्पमधील हेगलाइन महिंद्रा इनकोच येथे स्टिंग आॅपरेशन केल्याचे उघड झाले होते़सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत मॅथ्यू यांनी लष्करातील अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. स्टिंग व्हायरल झाल्यानंतर आपले कोर्ट मार्शल होईल, अशी भीती मॅथ्यू यांनी व्हिडीओत व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली होती. (प्रतिनिधी)डायरीचा तपास?मॅथ्यू यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना तपासणीत त्यांचा मोबाइल व मल्याळम भाषेतील डायरी सापडली होती़ त्याची चौकशी सुरू असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी सांगितले होते.विनापरवानगी लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून त्या ठिकाणची तसेच लष्करी जवान मॅथ्यूसह इतर जवानांची व्हिडिओ क्लिप काढून स्टिंग झाले. दोघांवर आॅफिशिअल सिक्रेट अ‍ॅक्ट व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़- विनायक लोकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक.