शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शिक्षणाचा खर्च परत करावा; वडिलांनी मुलावर दाखल केलेला खटला रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 06:02 IST

हायकोर्टाचा दिलासा : मुलांच्या शिक्षणासाठी ऐपतीप्रमाणे खर्च करणे हे पालकांचे कर्तव्य; ते कर्ज नव्हे

मुंबई : मुलाच्या अमेरिकेतील शिक्षणासाठी केलेला खर्च हे त्याला दिलेले कर्ज होते असे म्हणत त्याची परतफेड केली नाही म्हणून सुयोग अपार्टमेंट्स, मंडपेश्वर रोड, दहिसर (प.) येथील एका पित्याने त्याच्या सख्ख्या मुलाविरुद्ध महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेला फसवणूक व विश्वासघाताचा फौजदारी खटला मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

मोहन कृष्णन यांनी निखिल मोहन या आपल्या मुलाविरुद्ध हा खटला गुदरला होता व बोरीवली येथील महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन ‘प्रोसेस’ जारी केली होती. याविरुद्ध निखिल मोहन यांनी केलेली याचिका मंजूर करून न्या. मृदुला भाटकर यांनी खटला व त्यावर दंडाधिकाºयांनी दिलेला आदेश रद्द केला.

न्या. भाटकर यांनी म्हटले की, मुलांना शिक्षण देणे आणि त्यासाठी ऐपतीप्रमाणे खर्च करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. ते त्यांनी पार पाडले तर त्याबद्दल मुलांनी त्यांचे ऋणी असायला हवे. अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार प्रेम, ममत्व, काळजी व आपुलकीपोटी केले जातात व त्यातून कुटुंबातच खटलेबाजी होणे हे दुर्दैवी आहे. न्यायालयात येणाºया प्रकरणांमध्ये प्रचलित सामाजिक स्थितीचे प्रतिबिंब उमटत असते. समाजातील कौटुंबिक नीतिमूल्ये ºहास पावत आहेत, याचेच हे प्रकरण म्हणजे द्योतक आहे.

मुलाच्या शिक्षणासाठी आपण एकूण २९ लाख रुपये खर्च केले. ते सर्व पैसे चक्रवाढ व्याजासह परत करण्याचे मुलाने पत्राद्वारे कबूल केले होते. प्रत्यक्षात वारंवार मागणी करूनही त्याने पैसे परत केले नाहीत, म्हणून आपण हा खटला दाखल केला. याकडे नाते विसरून दोन सज्ञान व्यक्तींमधील झालेला व्यवहार म्हणून पाहिले जावे, असे वडिलांचे म्हणणे होते. वडिलांनी शिक्षणावर खर्च केला हे मुलाने मान्य केले व त्याबद्दल त्यांचे ऋणही मानले. स्वत:चे शिक्षण पूर्ण झाल्यावर आता बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी आपण पार पाडत आहोत. तशीच वडिलांचीही जबाबदारी आपण स्वीकारू, असे मुलाचे म्हणणे होते. मात्र चार वर्षांपूर्वी आई-वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा आपण आईची बाजू घेतली म्हणून वडिलांनी रागाने हा खटला दाखल केला, असा मुलाचा आरोप होता.

कायदेशीर मुद्द्यांचे विवेचन करताना न्या. भाटकर यांनी लिहिले की, वडिलांनी शिक्षणासाठी पैसे दिले व त्याने ते त्याच कामासाठी खर्च केले. यात विश्वासघाताचा कुठे प्रश्नच येत नाही. शिवाय फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी एकाने तोच हेतू मनात ठेवून दुसºयाला पैसे देण्यास भाग पाडणे अभिप्रेत आहे. प्रस्तुत प्रकरणात तसे घडलेले नाही.

या सुनावणीत मुलासाठी अ‍ॅड. विजय हिरेमठ यांनी, वडिलांसाठी अ‍ॅड. देवांग जरीवाला यांनी तर सरकारसाठी साहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर वीरा शिंदे यांनी काम पाहिले.मुलाने १५ लाख द्यावेतसुनावणीच्या दरम्यान मुलाने वडिलांना आपण १५ लाख रुपये देणे लागतो, याची कबुली दिली व येत्या मार्चपर्यंत तीन हप्त्यांत ही सर्व रक्कम परत करण्याचे लेखी वचन दिले. वडिलांनी आपल्या बँक खात्याचा तपशील दिला. त्यानुसार पुढील तीन महिन्यांत ठरावीक तारखेला मुलाने वडिलांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

टॅग्स :Americaअमेरिका