शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

औरंगाबादमध्येही ‘वाळीत’ प्रकरण

By admin | Updated: January 9, 2015 01:47 IST

रायगड जिल्ह्णापाठोपाठ आता औरंगाबाद येथेही वाळीत प्रकरण उघडकीस आले आहे़ एकाच जातीतील, एकाच गोत्रातील तरुणासोबत प्रेमविवाह केला.

औरंगाबाद : रायगड जिल्ह्णापाठोपाठ आता औरंगाबाद येथेही वाळीत प्रकरण उघडकीस आले आहे़ एकाच जातीतील, एकाच गोत्रातील तरुणासोबत प्रेमविवाह केला. तरीही कंजारभाट समाजाच्या एका दाम्पत्याबरोबरच त्यांच्या आई, वडील, भावांना जातपंचायतीने आठ वर्षांपासून समाजातून बहिष्कृत केले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या दाम्पत्याने जातपंचायतीला दंडाच्या रूपात आतापर्यंत १ लाख ७० हजार रुपयेही दिले; तरीही बहिष्कार मागे घेण्यात आला नाही. अखेर या दाम्पत्याने सिडको एमआयडीसी ठाण्याचे दार ठोठावले आणि गुन्हा दाखल करण्यात आला. जाधववाडीतील सिद्धेश्वर कॉलनीतील रंजना सचिन पांडे (३५) यांना २००२ मध्ये तिच्या पहिल्या पतीने सोडून दिले. त्यानंतर ती एकटीच राहत असताना तिची नारेगावातील विशाल तामचीकर याच्याशी ओळख झाली. दोघे एकाच समाजाचेच. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यातूनच त्यांना एक मुलगी झाली. घरच्यांची मान्यता असतांना समाजाला ही बाब खुपली. कंजारभाट समाजातील रूढीनुसार एकाच गोत्रातील तरुण-तरुणीचा विवाह होऊ शकत नाही. हे समाजाच्या परंपरेविरोधात आहे. त्यामुळे तुम्हाला बहिष्कृत करण्यात येत आहे’ असा निर्णय घेऊन या दोघांबरोबरच त्यांच्या आई- वडील, भावांच्या कुटुंबालाही पंचायतीने वाळीत टाकले. (प्रतिनिधी)पावणेदोन लाख उकळले!२००६ मध्ये जातपंचायतीत हा विषय ठेवण्यात आला. तेव्हा पंचायतीने या दोघांना गुन्हा केला म्हणून आधी दहा हजार रुपये दंड भरा, असा आदेश दिला. त्यांच्याकडून दहा हजार रुपये भरून घेतले. नंतर पुण्यातील पिंपरी-चिंचवड, आळंदी, इचलकरंजी, संगमनेर व औरंगाबाद याठिकाणी भरविण्यात आलेल्या वेगवेगळ्या जातपंचायतींमध्ये दंडापोटी म्हणून दोघांकडून आतापर्यंत १ लाख ७० हजार रुपये वसूल करण्यात आले; तरीही बहिष्कार मागे घेण्यात आला नाही. जातपंचायतीविरुद्ध बंडअनेकदा विनवण्या करून, दंड भरूनही जातपंचायत बहिष्कार मागे घेण्यास तयार होईना, म्हणून रंजना आणि विशालने समाजाविरुद्ध बंड पुकारण्याचा निर्णय घेतला आणि बुधवारी अखेर तिने सिडको एमआयडीसी ठाणे गाठले व जातपंचायतीविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून कंजारभाट जातपंचायतीचे महाराष्ट्र- कर्नाटक अध्यक्ष कविचंद भाट, औरंगाबादेतील पंचकमिटी सरपंच संपत मलके, उपसरपंच रतनू मलके, संजू तामचीकर, गोकुळ मलके, चरण माचरे, काळूराम मलके, बलबीर रावळकर, रामू इंद्रेकर, मजनू तामचीकर, धारासिंग माचरेकर (रा. सर्व नारेगाव, भाटनगर गल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांनी सांगितले.