शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

व्यंगचित्राचे पडसाद - बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

By admin | Updated: September 27, 2016 23:39 IST

सामना वर्तमानपत्रात आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी, जिल्ह्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाचा निषेध करून राजीनामे दिले आहेत

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. २७ : सामना वर्तमानपत्रात आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी, जिल्ह्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाचा निषेध करून राजीनामे दिले आहेत. चिखलीत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहीत खेडेकर व शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेले कपिल खेडेकर या खेडेकर बंधुंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेनेत विविध पदांवर व शिवसैनिक म्हणून कार्यरत मराठा समाजातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले आहे.

याच अंतर्गत युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहीत खेडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर कपिल खेडेकर यांनी शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत क्रांतीकारी निषेध नोंदविला. खेडेकर बंधुंच्या या निर्णयाने शिवसेनेत खळबळ उडाली असून मराठा समाजामध्ये या भूमिकेचे जोरदार स्वागत होत आहे. 

मेहकर :  वृत्तपत्रामध्ये आलेल्या आक्षेपार्ह व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मेहकर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजय जाधव यांनी यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नगरसेवक पदाचा राजीनामा पाठविला आहे. तसेच शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे यांनीही शिवसेनेच्या पदाचा राजीनामा पाठविला आहे.

लोणार : तालुक्यात गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेची धुरा सक्षमपणे सांभाळणारे तालुका शिवसेना प्रमुख प्रा.बळीराम मापारीसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवकुमार तेजनकर, पं.स.सदस्य मनोज तांबीले, पुंजाराम दहातोंडे,  जि.प.सदस्या सुलताने या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठविले आहेत.

 बुलडाणा : बुलडाणा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक हेमंत खेडेकर यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. व्यंगचित्रामुळे आपल्या भावना दुखावल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खामगाव : घाटाखालील तालुक्यांमधील शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.यासोबतच उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, नांदूरा तालुका प्रमुख बाळासाहेब धोरण, उप तालुका प्रमुख सुनील जुनारे, वडनेरचे सर्कल प्रमुख संतोष बिजवे, मलकापूरचे युवा तालुका प्रमुख दीपक जवरे यांनीही राजीनामे दिले आहेत.