शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या मार्गात कारशेडचा अडसर

By admin | Updated: October 20, 2016 05:28 IST

वडाळा ते कासारवडवली आणि त्यापाठोपाठ भिवंडी, कल्याण या मार्गावरील मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला.

ठाणे : वडाळा ते कासारवडवली आणि त्यापाठोपाठ भिवंडी, कल्याण या मार्गावरील मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला. तरी कारशेडचा मुद्दा आजही भिजत पडल्याची माहिती समोर आली आहे. आधीच स्थानिकांचा विरोध आणि पर्यावरणाच्या ऱ्हासावरून घोडबंदर भागातील कारशेडचा विषय चांगलाच गाजला होता. आता तर येथील हिश्श्यावरून ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएमध्ये ठिणगी पडली आहे. राज्य शासनदेखील यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याने कारशेडचे भवितव्य मात्र अधांतरी आहे. मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. मागील महिन्यात वडाळा ते कासारवडली या मेट्रो मार्गाला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला. बुधवारी भिवंडी-कल्याण या मार्गावरदेखील मेट्रो धावणार असल्याची घोषणा त्यांनी केली. परंतु, मेट्रोच्या या चार प्रकल्पांसाठी कारशेडची उभारणी ही महत्त्वाची ठरणार आहे. यापूर्वीच कारशेडसाठी घोडबंदर भागातील ओवळा येथील ४० हेक्टर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन ती संपादित करून तशा प्रकारचा ठराव पालिकेने अंतिम मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवावा, असा निर्णय जुलै २०१४ मध्ये झाला आहे. परंतु, दोन वर्षे उलटूनही त्यात कोणत्याही प्रकारची प्रगतीच झाली नसल्याची बाब समोर आली आहे. पालिका अधिकारी आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात या जागेची पुन्हा पाहणी केली होती. त्यानंतर, स्थानिक रहिवासी व जागामालक यांना विश्वासात घेऊन भूसंपादनाचा निर्णय घ्यावा. तसेच जागा अधिग्रहण करण्यासाठी ठाणे महापालिकेने धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे एमएमआरडीए आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर ठरले. मात्र, अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा हा विषय गुंडाळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ठाणे महापालिकेने येथील कारशेडची जागा आरक्षित करण्यासाठी हिरवा कंदील दिला असला तरी यापैकी १० हेक्टर जागा शहरांतर्गत प्रस्तावित असलेल्या मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमसाठी मिळावी, असा ठराव केल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)>एमएमआरडीने केली संपूर्ण जागेची मागणीहा प्रस्ताव शासनपातळीवर गेल्यानंतर एमएमआरडीएने त्याला विरोध दर्शवला असून येथील संपूर्ण जागेची मागणी पालिकेकडे केली आहे. ही ४० हेक्टर जागा असली तरीदेखील प्रत्यक्षात किती जागेची गरज आहे, किती जण बाधित होणार, आदिवासींची जागा घेणे शक्य आहे का? आदी सर्वच बाबींचा विचार अद्याप सुरू झालेला नाही. किंबहुना, त्याला अद्यापही म्हणावा तितका वेग प्राप्त झालेला नाही. त्याशिवाय, जागा आरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेली हरकती सूचनांची कायदेशीर प्रक्रियादेखील शासनाने सुरू केलेली नाही.याशिवाय, या जागेची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासावी लागणार आहे. शिवाय पर्यावरणाच्या संभाव्य नुकसानीचा अंदाजही घ्यावा लागणार असून त्याचाही अद्याप कुठेही विचार झालेला नाही.