शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचे शीर हातात घेऊन क्रूरकर्मा रस्त्यात फिरला

By admin | Updated: October 10, 2015 06:01 IST

जावयाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्यानंतर धडावेगळे केलेले तिचे शिर आणि रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन भरदिवसा रस्त्यावर फिरणाऱ्या

पुणे : जावयाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्यानंतर धडावेगळे केलेले तिचे शिर आणि रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन भरदिवसा रस्त्यावर फिरणाऱ्या क्रूरकर्म्यास पोलिसांनी अटक केली. कात्रज येथील सुखसागर नगरमध्ये शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.गेल्या २० वर्षांपासून ओसवाल प्लॉटवर रखवालदार म्हणून काम करणाऱ्या रामचंद्र सेऊ चव्हाण (५३) याला दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्याच्या दोन मुलींची लग्न झालेली असून एक मुलगी गुलबर्गा येथे तर दुसरी मुलगी मुंबई येथे असते. तर राजेश आणि उमेश ही मुले त्यांच्यासोबतच राहतात. हे सर्व जण ओसवाल प्लॉटवर रहात होते. तो मूळचा कर्नाटकमधील गुलबर्गा येथील असून गेली चाळीस वर्ष तो पुण्यात राहतो. पत्नी तसेच कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत रामचंद्रची नेहमीच भांडणे होत असे. शुक्रवारी सकाळी त्याची दोन्ही मुले कामावर गेली. त्यावेळी घरात रामचंद्र याची पत्नी सोनाबाई (४५) तसेच राजेशची पत्नी सुनीता आणि त्यांची दोन लहान मुले होती. जावयाशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरुन चिडलेल्या रामचंद्रने सुनेसह नातवंडांना घरात कोंडले. दाराला बाहेरून कुलूप लावले. अंगणातच त्याने सोनाबाई हिच्या गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घातला, अशी माहिती परिमंडल दोनचे उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली. सोनाबाईचे शीर घेऊन रामचंद्र गजबजलेल्या रस्त्याने पोलीस चौकीकडे जात होता. अंगावर काटा आणणारे हे दृश्य पाहून नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. तर एका दुचाकीस्वाराने राजेश सोसायटी परिसरात वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलीस व्ही. के. कुमकर, डी. एन. जगताप आणि भालचंद्र तंवर यांना या प्रकाराची माहिती दिली. (प्रतिनिधी)क्रूरतेची चित्रफीत व्हायरलपत्नीचा खून केल्यानंतर रामचंद्र हातात शीर आणि कुऱ्हाड घेऊन जात असताना रस्त्याने जाणाऱ्या काही तरुणांनी मोबाईलमधून त्याचे चित्रीकरण केले. काही वेळातच ही चित्रफीत व्हॉट्सअ‍ॅपवरुन वाऱ्यासारखी पसरली.