शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हा तर कॉंग्रेसचा वाह्यातपणा, मधुर भांडारकर

By admin | Updated: July 16, 2017 19:18 IST

इंदु सरकार चित्रपटासंदर्भात कॉंग्रेसकडून घेण्यात आलेल्या आक्रमक भुमिकेवर चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 16 :  इंदु सरकार चित्रपटासंदर्भात कॉंग्रेसकडून घेण्यात आलेल्या आक्रमक भुमिकेवर चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कॉंग्रेस एका काल्पनिक चित्रपटाला घाबरत आहे हे आश्चर्यजनक आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून कॉंग्रेसचे नेते प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. हा पक्षाचा वाह्यातपणाच आहे, या शब्दांत भांडारकर यांनी टीका केली आहे. नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.मधुर भांडारकर चित्रपटासंदर्भात पत्रपरिषद घेण्यासाठी नागपुरात आले होते. मात्र कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रपरिषदेच्या स्थळी घेराव केला. त्यामुळे दिवसभर नागपुरात असूनदेखील भांडारकर यांना बोलता आले नाही. अखेर त्यांनी नागपूर विमानतळावर आपल्या भावना व्यक्त केल्या. शाई फेकण्याची धमकी देणे, चित्रपट न पाहताच गोंधळ घालणे आणि बोलण्याची संधी न देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. हा चित्रपट काल्पनिक असून कॉंग्रेसची भुमिका अयोग्य आहे, असे भांडारकर म्हणाले. हा चित्रपट कुठल्याही राजकीय पक्षाने स्पॉन्सर केला नाही. जर असे असते तर मी १०० टक्के चित्रपट पूर्णपणे आणीबाणीवरच काढला असता आणि निवडणूकांच्या वेळी प्रदर्शित केला असता. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मी टिष्ट्वट करुन हे कधीपर्यंत चालणार, असा प्रश्न विचारला आहे. ते पक्षाचे नेते आहे. त्यामुळे त्यांनाच विचारले, असे भांडारकर यांनी प्रतिपादन केले. मी काहीशी घाबरली आहे. मात्र कुठल्याही परिस्थितीत कुणासमोर झुकणार नाही, असे चित्रपटाची अभिनेत्री किर्ती कुल्हारी हिने सांगितले.कायदेशीर दाद मागणारसेन्सॉरने या चित्रपटात १७ कट करण्यास सांगितले आहे. मात्र माझी त्यासाठी तयारी नाही. याबाबत कायदेशीर दाद मागण्यात येईल व ट्रिब्युनलमध्ये जाण्यास तयार आहोत. एखाद्या लेखकाला पुस्तकात काय लिहीले आहे, असे विचारत नाहीत. चित्रपट दाखविण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसतर्फे होत आहे. मात्र मी कुणालाही प्रदर्शनाअगोदर चित्रपट दाखविणार नाही. आज एक बोलतोय, उद्या दुसरा कुणी बोलेल, असे भांडारकर यांनी स्पष्ट केले.