शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधवांच्या कर्मभूमीत पेढे वाटून आनंदोत्सव

By admin | Updated: May 18, 2017 20:15 IST

हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली.

ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 18 - हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाचं देशभरातून स्वागत करण्यात येत आहे.  हे वृत्त कुलभूषण जाधव यांची कर्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील आनेवाडीत येऊन धडकताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पंचायत समिती सदस्या जयश्री गिरी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत निर्णयाचे स्वागत केले. सकाळपासून टीव्हीसमोर बसलेल्या ग्रामस्थांकडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
 
भारत सरकारने कुलभूषण जाधव यांना न्याय मिळवून द्यावा, त्यांची सुटका करण्यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी आनेवाडी ग्रामस्थांनी सरकारकडे वारंवार केली होती. त्यांच्या सुटकेसाठी आनेवाडीकरांनी देवाकडे धावा केला होता. त्या प्रार्थनेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.
 
प्रसार माध्यमातून कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याचे वृत्त समजताच पंचायत समिती सदस्या जयश्री गिरी, सरपंच अश्विनी शिंदे यांच्यासह आनेवाडी ग्रामस्थ तालुक्याच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. त्यांनी ह्पाकिस्तान मुदार्बाद...घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली.
 
भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल सुनावला. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने, “महाराष्ट्राचे नागरिक कुलभूषण जाधव हे हेर असल्याच्या पाकिस्तानच्या म्हणण्याला ठोस पाठबळ नाही. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना अंतिम निर्णयापर्यंत फाशी दिली जाऊ नये”, असं ठणकावून सांगितलं. इतकंच नाही तर पाकिस्तानात कुलभूषण जाधव यांच्या जीवाला धोका आहे. जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत कुलभूषण जाधव सुरक्षित असतील, याची हमी पाकिस्तानने द्यावी, असा आदेशही कोर्टाने दिला. कोर्टाच्या या निर्णयानंतर आनेवाडी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. न्यायालयाच्या निर्णयामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला असून भारताने  पाकिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे.
 
भारतासाठी हेरगिरी केल्याचा ठपका ठेवत कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत, भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला.
 
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12 मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.