शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मलवाहिन्यांची देखभाल खासगी कंपनीकडे

By admin | Updated: June 28, 2016 02:00 IST

मलवाहिन्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या मलनि:सारण प्रचलन खात्याकडे अभियांत्रिकी कर्मचारी व अधिकारीच नाहीत़

मुंबई : मुंबईतील मॅनहोल्सला जोडणाऱ्या मलवाहिन्यांच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या मलनि:सारण प्रचलन खात्याकडे अभियांत्रिकी कर्मचारी व अधिकारीच नाहीत़ त्यामुळे मलवाहिन्यांचे सर्वेक्षण आणि देखभालीचे खासगीकरण करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे़ या कामासाठी खासगी पुरवठा कंपनीकडून मनुष्यबळ घेण्यात येणार आहे़ यासाठी तब्बल पावणेचार कोटी रुपये ठेकेदाराला मोजण्यात येणार आहेत. मुंबईत दररोज तयार होणाऱ्या मलजलावरप्रक्रिया करून त्याचे शुद्धीकरण केलेले मलजल समुद्रात किंवा खाडीत सोडण्यात येत असते़ यासाठी मुंबईतील इमारती व वसाहतींमधील शौचालयांची जोडणी ही मलवाहिन्यांशी करण्यात आलेली आहे़ मलनि:सारण प्रचलन खात्यामार्फत अंतर्गत स्थितीचे सर्वेक्षण, मलवाहिन्यांचे चरविरहित पद्धतीने पुनर्वसन व रस्त्यांखालून जाणाऱ्या मलजोडण्यांचे सर्वेक्षण आदी कामे केली जातात़या वर्षी सुमारे ४० कि़मी. लांबीच्या वाहिन्यांचे चरविरहित पद्धतीने पुनर्वसन करण्यात येणार आहे़ त्याचबरोबर मनुष्यप्रवेश शक्य नसलेल्या मलवाहिन्यांची स्थिती तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे़ मात्र उर्वरित कामांची देखभाल करण्यासाठी या खात्याकडे पुरेसा अभियांत्रिकी वर्ग नाही़ (प्रतिनिधी)।या कामांची असेल जबाबदारीशहर व उपनगरातील मलवाहिन्यांच्या अंतर्गत स्थितीचे सर्वेक्षण, मलवाहिन्यांच्या चरविरहित तंत्रज्ञानाने पुनर्वसन, मॅनहोल्समधील मालमत्ता जोडण्याचे सर्वेक्षण तसेच वेळोवेळी हाती येणारी इतर कामे अशी जबाबदारी संबंधित कंपनीवर असणार आहे़ खासगी मनुष्यबळ१ प्रकल्प व्यवस्थापक, २ प्रकल्प उपव्यवस्थापक, ३० प्रकल्प अभियंते, २ विश्लेषक अभियंते, २ संगणक आॅपरेटर आणि ४ कार्यालय सहायक आदी मनुष्यबळ खासगी कंपनी उपलब्ध करून देणार आहे़ प्रकल्प व्यवस्थापकांचे मासिक वेतन पावणेदोन लाख रुपये असणार आहे़