शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विमान न मिळाल्याने हृदयाची धडधड थांबली

By admin | Updated: January 16, 2016 01:35 IST

नियोजित विमान उपलब्ध न झाल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या एका २४वर्षीय तरुणाचे हृदय वेळीच चेन्नईला पोहोचू शकले नाही. दुसऱ्या कंपन्यांच्या विमानांनी, पायलटने नकार दिल्यामुळे त्याच्या

औरंगाबाद : नियोजित विमान उपलब्ध न झाल्याने ‘ब्रेन डेड’ झालेल्या एका २४वर्षीय तरुणाचे हृदय वेळीच चेन्नईला पोहोचू शकले नाही. दुसऱ्या कंपन्यांच्या विमानांनी, पायलटने नकार दिल्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड कायमची थांबली. मात्र या तरुणाच्या किडन्या आणि लिव्हरचे यशस्वी प्रत्यारोपण झाल्याने तिघांच्या आयुष्याला नवा प्रकाश मिळाला.राम मगर या अवघ्या २४ वर्षांच्या तरुणाचा अपघातामध्ये ‘ब्रेन डेड’ झाला. त्यानंतर त्याच्या किडन्या, लिव्हर आणि हृदय दान करण्यासंदर्भात त्याच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात आले. अवयवदानाच्या माध्यमातून आपला राम पुन्हा एका कोणामध्ये तरी पाहता येईल, या भावनेने त्यांनी त्यास तत्काळ होकार दिला होता. त्याची एक किडनी धूत हॉस्पिटल, तर दुसरी किडनी आणि लिव्हर मुंबई येथील रुग्णाला दान करण्यात आली. तर, हृदयाचे चेन्नई येथील रुग्णास प्रत्यारोपण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार ओरिया एव्हिएशनच्या वतीने चेन्नईसाठी चार्टर्ड विमान देण्यात येणार होते. त्यासाठी गुरुवारी रात्री ११ वाजता चिकलठाणा विमानतळावरून हे विमान उड्डाण करणार होते. सूचना मिळताच मुंबई येथून औरंगाबादला विमान आल्यानंतर या वेळेला चेन्नईसाठी रवाना होणार होते; परंतु ओरिया एव्हिएशन यांना दिलेली वेळ बदलून दुपारी १ वाजेची करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ही वेळ पुढे ढकलण्यात आली. रात्री ९.३० वाजेची वेळ निश्चित करण्यात आली; परंतु या वेळेत विमानाचे उड्डाण शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मध्यरात्री १ वाजेची वेळ ठरवण्यात आली; परंतु शुक्रवारी सकाळी ९ वाजता अन्य ठिकाणाचे बुकिंग असल्यामुळे उड्डाण शक्य नसल्याचे ओरिया एव्हिएशनचे सीईओ राजेश साहू यांनी सांगितले. त्यामुळे अन्य विमानाची, एअर अ‍ॅब्युलन्सची शोधाशोध करण्यात आली; परंतु त्यास यश मिळाले नाही. त्यामुळे अधिक उशीर झाल्याने हृदयाचे प्रत्यारोपण शक्य झाले नाही.हृदयाचे प्रत्यारोपण चेन्नई येथील रुग्णावर करायचे होते; परंतु ते झाले नाही. हृदयाचे प्रत्यारोपण होऊ शकले नाही, याचे दु:ख करण्यापेक्षा तीन अवयवांचे प्रत्यारोपण झाले, ही मोठी गोष्ट आहे. - डॉ. आनंद देवधर, हृदयशल्यचिकित्सक, सिग्मा हॉस्पिटल