शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोटाची अफवा पसरविणाºयाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:42 IST

चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा पसरविणाºया बाबू खेमचंद चौहान (५५) या इसमाला अटक करण्यात आली.

मुंबई : चर्चगेट स्थानकात बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा पसरविणाºया बाबू खेमचंद चौहान (५५) या इसमाला अटक करण्यात आली. रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने बाबू चौहानला अटक केली. बाबू चौहानने अफवेच्या फोनची कबुली दिली असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.मूळचा अहमदाबादचा असणारा बाबू चौहान सध्या माहिम येथील खांडेपारकर हॉस्पिटलसमोरील पदपथावर वास्तव्यास होता. बिगारी आणि कॅटरिंग काम बाबू करत असे. रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने बाबूकडे चर्चगेट स्थानकाच्या फोनबाबत विचारणा केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.‘श्रीनगर येथील बॉम्बस्फोटासारखा बॉम्बस्फोट चर्चगेट स्थानकांत होणार आहे,’ असा निनावी फोन रेल्वे सुरक्षा बलाच्या १८२ या क्रमांकावर आला होता. १३ जुलैला सकाळी १० वाजून ४४ मिनिटांनी हा फोन आल्यानंतर, चर्चगेट स्थानकात हाय अ‍ॅलर्ट घोषित करण्यात आला. त्याच बरोबर स्थानकात रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, दहशतवादविरोधी पथकासह डॉग स्क्वॉडदेखील दाखल झाले. चर्चगेट स्थानकासह स्थानकांतील सर्व रेल्वे बोगींची तपासणी सुरू झाली. तपासाअंती ही केवळ अफवा असल्याने, सुरक्षा यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला.