शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कारची झाडाला धडक; भावंडं ठार

By admin | Updated: December 7, 2014 00:25 IST

कापड खरेदी करून नागपूरवरून अहेरीकडे येत असताना सँट्रो कार झाडाला जबरदस्त धडकल्याने झालेल्या अपघातात अहेरी येथील कापड व्यावसायिक आर्इंचवार बंधू जागीच ठार झाले.

चौडमपल्लीलगतची घटना : नागपूरवरुन येताना अपघातअहेरी/आष्टी (जि. गडचिरोली) : कापड खरेदी करून नागपूरवरून अहेरीकडे येत असताना सँट्रो कार झाडाला जबरदस्त धडकल्याने झालेल्या अपघातात अहेरी येथील कापड व्यावसायिक आर्इंचवार बंधू जागीच ठार झाले. अहेरीपासून २२ किमी अंतरावर चौडमपल्ली महाकाली मंदिरालगत शनिवारी पहाटे ५ वाजता हा अपघात झाला. या भीषण अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. अहेरी येथील बाजारपेठ शुक्रवारी बंद राहत असल्याने कापड व्यावसायिक महेश विजय आर्इंचवार (३७) व अभय विजय आर्इंचवार (३६) हे दोघेही नागपूर येथे खरेदीसाठी एमएच ३४ के ५३५९ या सँट्रो कारने गेले होते. नागपूरवरून रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ते अहेरीकडे परत निघाले. थंडीमुळे दाट धुक्यातच त्यांचा प्रवास सुरु होता. धुक्यामुळे समोरचे अंधुक दिसत होते. त्यामुळे पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांची कार झाडाला धडकली. या अपघातात विजय व अभय आर्इंचवार हे दोघेही भाऊ जागीच ठार झाले. चालक पंकज शुद्दलवार (२३) रा. अहेरी याचे हात व पाय फ्रॅक्चर झाले. उमेश सेकृतीवार (२२) रा. अहेरी याच्या डोक्याला जबर दुखापत झाली तर रवी बोम्मेन (२२) रा. कन्नेपल्ली हे गंभीर जखमी झाले. तिघांवरही चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. घटनेच्यावेळी स्वत: मृतक महेश आर्इंचवार हे वाहन चालवीत होते.घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.या घटनेमुळे शनिवारी अहेरीतील व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती. मृतक महेश याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व अभय याच्या मागे पत्नी, एक मुलगी व आईवडील असा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अहेरी येथील प्राणहिता नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)