शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

अडीच कोटींच्या जुन्या नोटा हस्तगत

By admin | Updated: March 10, 2017 02:15 IST

ताडदेव आणि अ‍ॅण्टॉपहील येथून पोलिसांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या अडीच कोटींच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : ताडदेव आणि अ‍ॅण्टॉपहील येथून पोलिसांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या अडीच कोटींच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ताडदेव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांना दोन तरुण चलनातून रद्द केलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी हाजीअली येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांच्या नेतृत्वाखाली ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय सुर्वे यांच्या पथकाने सापळा रचला. बुधवारी रात्री उशिराने कारमधून संशयास्पद उतरत असलेल्या दोघांच्या कारमधून त्यांनी तब्बल १ कोटी ६० लाखाच्या जुन्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणी मालाडचा रहिवासी असलेला व्यापारी सायर लाखाजी माली याच्यासह इस्टेट एजेंट जयमिन अरविंद व्होरा याला अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे अ‍ॅण्टॉपहील पोलीस ठाण्याचे अंमलदार दत्तात्रय बनसोडे यांना मिळालेल्या माहितीवरून येथील कल्पक नाका परिसरातून एका त्रिकूटाकडूनही ९३ लाख ८० हजार पाचशे रुपयांच्या पाचशे आणि हजार रुपये दराच्या जुन्या नोटा जप्त केल्या. या प्रकरणात रोहीत पाठक, प्रवीण कांबळे, आल्वीन बोर्डे या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. (प्रतिनिधी)खालापुरातही जुन्या नोटा पकडल्याचलनातून बाद झालेल्या पाचशे रुपयांच्या सुमारे साडेसात लाख रुपयांच्या पंधराशे नोटांसह अनंता पाटील (रा. रानडे तोंडली) याला खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खालापूर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांना मंगळवारी संध्याकाळी एक व्यक्ती लाल रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून जुन्या नोटा घेऊन पेण-खोपोली मार्गावर डोणवत बसथांब्याजवळ उभी असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती.पोलीस निरीक्षक विकास रामुगडे यांनी तातडीने महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे, पोलीस नाईक पडळकर, पवार, खंडागळे, गायकवाड व पोलीस शिपाई खरे यांचे पथक डोणवतकडे रवाना केले. पोलीस पथक डोणवत बसथांबा येथे पोहोचल्यानंतर मिळालेल्या माहितीतील वर्णनानुसार लाल रंगाची प्लॅस्टिकची पिशवी घेऊन उभी असलेली व्यक्ती आढळून आली. महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे यांनी अनंता पाटील या संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले.