शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

विषम परिस्थितीवर मात करण्याची महिलांमध्ये क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 01:37 IST

सध्या तंत्रज्ञान आणि समाजावर होणाºया बदलांचा परिणाम व्यवसायावर आणि त्याच्या कल्पकतेवर होत आहे. महिला उद्योजिकांमध्ये व्यवसायाचे कौशल्य असते.

ठळक मुद्देतज्ज्ञांचा सूर : व्हीआयए महिला विंगतर्फे उद्योजिकांसाठी कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सध्या तंत्रज्ञान आणि समाजावर होणाºया बदलांचा परिणाम व्यवसायावर आणि त्याच्या कल्पकतेवर होत आहे. महिला उद्योजिकांमध्ये व्यवसायाचे कौशल्य असते. त्यांनी बाहेरील मदतीची वाट न पाहता स्वत:मध्ये असलेल्या कौशल्याने उद्योगाचा विकास करावा, असा सूर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी येथे काढला.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) महिला विंगतर्फे उद्योग भवन, सिव्हिल लाईन्स येथील व्हीआयएच्या सभागृहात ‘महिला उद्योजिका व २०३० : भविष्यात तयारीची मूळ स्थिती’ आणि ‘महिला उद्योजिकांची स्थिती, सहकार्य व यश’ या विषयांवर दोन कार्यशाळांचे आयोजन गुरुवारी करण्यात आले.पहिल्या कार्यशाळेत व्हीआयए अ‍ॅग्रो व फूड प्रोसेसिंग फोरमचे चेअरमन व रास फ्रोजन फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक अरुण खोब्रागडे यांनी तर दुसºया कार्यशाळेत इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या (आयएमटी) प्रा. डॉ. स्मिता दाभोळकर-सिंग आणि डॉ. अभिषेक सिंग यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा साची मलिक यांनी केले. संचालक सहसचिव रश्मी कुळकर्णी यांनी तर सचिव रिता लांजेवार यांनी आभार मानले. यावेळी व्हीआयएचे कोषाध्यक्ष गिरीश देवधर, महिला विंगच्या माजी अध्यक्षा व सल्लगार सरला कामदार यांच्यासह महिला उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.व्यवसायात विशिष्टता आणावी : अरुण खोब्रागडेअरुण खोब्रागडे म्हणाले, दुसरा करतो म्हणून मी करतो, हे चुकीचे आहे. व्यवसायात विशिष्टता आणावी लागेल. पूर्वी व्यवसाय करताना बाजारपेठेची निवड करावी लागायची, पण आता बाजारपेठ मोबाईलवर गेली आहे. शेजारच्या दुकानाची तुलना आता तुम्हाला करता येणार नाही. व्यवसायात विशिष्टता ठेवणे गरजेचे झाले आहे. व्यवसाय वाढीसाठी अ‍ॅमेझॉनने हेच केले. नागपूरचे उदाहारण द्यायचे झाल्यास संतोष पकोडेवाला आणि कस्तूरचंद पार्क येथील पोहेवाल्याने व्यवसायात विशिष्टता (युनिकनेस) आणल्यामुळे शहराच्या कानाकोपºयातील ग्राहक त्यांच्याकडे येतात. त्यामुळेच त्यांच्या व्यवसायाने तग धरला आहे. असे व्यवसाय दीर्घकाळ टिकतात, असे अरुण खोब्रागडे म्हणाले.स्वत:ची ओळख निर्माण करा : डॉ. स्मिता दाभोळकर-सिंगमहिला उद्योजिकेला स्वत:ची ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. व्यवसाय तुम्ही स्व:खुशीने करता वा नाईलाजाने करता आहात, हे प्रारंभी पाहावे. यश मिळाले नाही तर दु:खी होता. तुम्ही जे काम करीत आहात, त्याचे नियंत्रण कुठे आहे, हे तपासून पाहावे. बाहेरून पाठिंबा घेण्याची गरज नाही, ते उद्योजिकेत असतेच. परिश्रमाने स्वत:ची ओळख निर्माण करा, असा सल्ला इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या (आयएमटी) प्रा. डॉ. स्मिता दाभोळकर-सिंग यांनी दिला.आव्हानांवर मात करा : डॉ. अभिषेक सिंगशिक्षित पण रोजगारापासून अनेक वर्षे दूर असलेल्या महिलांना शासकीय योजनांची माहिती नसते आणि ते कुणीही सांगत नाही. उद्योग सुरू केलेल्या १०० पैकी ९० महिलांना पाठिंबा नसतो. त्यावर संशोधन केले आहे. तणाव हे मुख्य कारण आहे. महिलांना अनेक बंधने आणि आव्हाने असतात. त्यावर मात करून व्यवसाय करा, पैसा मिळवा, असे आवाहन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीचे (आयएमटी) प्रा. डॉ. अभिषेक सिंग यांनी केले. त्यांनी दंगल चित्रपटातील कुस्तीचा संदर्भ आणि चीनमधील अलीबाबा समूहाचे संस्थापक जॅक मा यांच्या प्रगतीची माहिती दिली.