शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
5
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
8
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
9
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
10
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
11
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
12
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
13
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
14
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
15
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
16
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
17
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
18
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
19
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
20
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार

मराठीचा कॅनव्हास मोठा झाला पाहिजे

By admin | Updated: February 1, 2015 01:05 IST

निर्मात्यांनाही आपला चित्रपट मराठीबरोबर प्रदर्शित करताना एक प्रकारची भीती वाटेल, त्याचीच ‘बाजी’ हा चित्रपट ठिणगी असेल, असा विश्वास अभिनेते जितेंद्र जोशी याने व्यक्त केला.

पुणे : मराठी चित्रपटाचा ‘कॅनव्हास’ हा मोठा झालाच पाहिजे. हिंदी चित्रपटसृष्टीतही तो आपला दबदबा निर्माण करू शकेल, निर्मात्यांनाही आपला चित्रपट मराठीबरोबर प्रदर्शित करताना एक प्रकारची भीती वाटेल, त्याचीच ‘बाजी’ हा चित्रपट ठिणगी असेल, असा विश्वास अभिनेते जितेंद्र जोशी याने व्यक्त केला.मराठीमध्ये प्रथमच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीस तोड असलेला ‘बाजी’ हा चित्रपट येत्या ६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्याच्या प्रमोशनसाठी चित्रपटात खलनायकी रंग दाखविणारा जितेंद्र आणि सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणारा श्रेयस तळपदे यांच्यासह निर्माते अमित अहिरराव यांनी शनिवारी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन संवाद साधला़ या वेळी ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर आणि महाव्यवस्थापक मिलन दर्डा यांनी स्वागत केले़^‘थ्री चिअर्स’ नाटकानंतर तब्बल १५ वर्षांनी श्रेयस आणि जितेंद्र ही जोडी आणि ‘इक्बाल’नंतर ७ वर्षांनी अभिनेता म्हणून श्रेयस, असा योग ‘बाजी’च्या माध्यमातून पुन्हा जुळून आला आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल दोघांच्याही मनात एक वेगळे स्थान असल्याचे त्यांच्या संवादातून जाणवले. दोघेही केवळ चित्रपटाबद्दलच नव्हे; तर एकमेकांबद्दल खूपच भरभरून बोलत होते. जितेंद्र म्हणाला, ‘‘श्रेयस हा कमी बोलणारा आणि मी बोलघेवडा. त्यातच आमचा जन्मदिवस आणि रासही एकच. त्यामुळे आमचे ट्यूनिंग खूप छान जुळले़’’ त्यावर श्रेयसनेही नाटकामध्ये जितेंद्रची छोटी भूमिका असूनही त्याची कामाविषयीची समर्पित वृत्ती, प्रामाणिकपणा, अफाट ऊर्जा या गुणांचे मनापासून कौतुक केले. ‘बाजी’मध्ये त्याने जो ‘मार्तंड’ साकारला आहे, त्याच्याशिवाय तो कुणीच करू शकले नसते, असे सांगून व्हॅनिटीमध्ये बसलेले असताना तुम्हाला कुणीतरी भेटायला आले असल्याचे सांगितले़ मी पाहिले तर एक टकला, मिशी काढलेला माणूस समोर दिसला आणि मी ‘जित्या तू’ असे म्हणून ओरडलोच. त्या भूमिकेत तो मनापासून शिरला होता, अशी आठवण श्रेयसने सांगितली. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या दर्जाचा हा चित्रपट झाला असून, प्रदर्शनापूर्वीच टे्रलरमुळे ‘बाजी’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य अ‍ॅक्शन मास्टरांकडूनच हे सीन साकारण्यात आल्याने आमची पूर्णत: वाट लागली असल्याचे जितेंद्र मिस्कीलपणे म्हणाला. या वेळी ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्ूटचे संस्थापक विजय शेंडकर, जनरल प्रँक्टिशनर असोसिएशनचे (जीपीए)चे अध्यक्ष डॉ. संताजी कदम उपस्थित होते.(प्रतिनिधी)अनेक दुखापतींचा सामना करावा लागला४श्रेयस म्हणाला, ‘‘या चित्रपटासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी खूप करावी लागली. ‘इक्बाल’मध्ये नागेश कुकुनूर याने अभिनयाच्या साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढले होते. ‘बाजी’मध्ये निखिल महाजनने तेच केले. म्हणूनच घोडेस्वारी येत नसूनही, ती करण्याचा विश्वास, श्वास रोखून धरणारे अ‍ॅक्शन सीन करायला बळ मिळाले. ते सीन करताना अनेक दुखापतींचा सामना करावा लागला; पण आशा सोडली नाही, असे श्रेयसने सांगताच जितेंद्रनेही त्याला दुजोरा देत मरणाच्या दारातून तो परत आल्याचे सांगितले. ‘बाजी’ चित्रपटाचे बजेट हे ६ कोटींच्या आसपास आहे. मात्र, हा चित्रपट ज्या पद्धतीने साकार झाला आहे, ते पाहून हे बजेट कमी आहे की काय, असे वाटते. ते वाढवू शकलो नाही, याची आता खंत वाटते.- अमित अहिरराव, निर्माता या चित्रपटासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी खूप करावी लागली. मात्र अ‍ॅक्शन सीन करायला आम्हाला बळ मिळाले. या चित्रपटामुळे मराठी चित्रपटाच्या व्यावसायिकतेचीही समीकरणे बदलतील. त्याचप्रमाणे हा चित्रपट रसिकांनाही खूप आवडेल. - श्रेयस तळपदे, अभिनेता.