शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

‘जलमित्र’ अभियानास ‘कॅनन’ची साथ!

By admin | Updated: May 18, 2016 02:24 IST

‘जलमित्र’ अभियानात दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पावभाजी सेंटर ‘कॅनन’ने साथ दिली आहे

मुंबई : ‘लोकमत’ने पाणीबचतीसाठी राज्यभर सुरू केलेल्या ‘जलमित्र’ अभियानात दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध पावभाजी सेंटर ‘कॅनन’ने साथ दिली आहे. दररोज हजारो खवय्ये येणाऱ्या ‘कॅनन’ने ‘लोकमत-जलमित्र’ अभियानांतर्गत पाणी वाचवण्याची मोहीम सुरू केली आहे.छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे बहुतेक प्रवासी ‘कॅनन’चा स्टॉप घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. पावभाजी, वडापाव अशा नानाविध पदार्थांची चव चाखल्यानंतर घाईघाईतच खवय्ये जमेल तितके पाणी पिऊन पुढील कामासाठी धाव घेतात. या गडबडीत बहुतेक खवय्ये अर्धाच ग्लास पाणी पित असल्याचे ‘लोकमत’च्या निदर्शनास आले होते. उरलेल्या अर्धा ग्लास पाण्याची माहिती घेतली असता, हे पाणी वॉश बेसिनमध्ये ओतत असल्याचे समजले. त्यामुळे हजारो लीटर पाणी रोज वॉश बेसिनमधून नाल्यामध्ये जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, ‘लोकमत’ने कॅननचे चालक अप्पा दांडेकर यांची भेट घेत, जलमित्र अभियानाबाबत माहिती दिली. अप्पांनीही या अभियानात सामील होण्यास होकार दर्शविला. प्रत्येक खवय्याला पाण्याचे महत्त्व पटावे, म्हणून कॅननच्या कट्ट्यावर पाणीबचतीचे संदेश देणारे टेंटकार्ड ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, कॅननसमोर पाणीबचतीसाठी ड्रम ठेवण्यात आला आहे. या ड्रममध्ये खवय्यांच्या ग्लासमध्ये उरलेले पाणी साठवण्यात येईल. शिवाय, या पाण्याचा पुनर्वापर जास्त खराब झालेली भांडी प्राथमिक स्वरूपात साफ करण्यासाठी होईल. त्यानंतर, स्वच्छ पाण्याने भांडी पुन्हा साफ करता येतील. त्यामुळे भांडी घासण्यासाठी कमीत कमी स्वच्छ पाणी लागेल, शिवाय वाया जाणाऱ्या पाण्याचाही पुनर्वापर होईल.