शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांनो, विजय असू द्या फटाकेमुक्त!

By admin | Updated: October 17, 2014 01:50 IST

तीनच दिवसांत मतदानयंत्रे बोलू लागतील आणि जय-पराजय निश्चित होईल. त्यामुळे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होण्याची शक्यता सर्वानीच गृहीत धरली आहे.

सातारा : तीनच दिवसांत मतदानयंत्रे बोलू लागतील आणि जय-पराजय निश्चित होईल. त्यामुळे दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होण्याची शक्यता सर्वानीच गृहीत धरली आहे. मात्र, निवडणुकीतील विजय फटाकेमुक्त करून पर्यावरण संतुलनात वाटा उचलून आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याचे संकेत द्यावेत, असे आवाहन उमेदवारांना अंधश्रद्धा निमरूलन समिती (अंनिस)करणार आह़े 
रविवारी मतमोजणीचा दिवस आहे. दिवाळीही तोंडावर आहे. परंतु निवडणुकीत विजय निश्चित होण्यापूर्वीच प्रचारातील पदयात्रंपासून सर्वत्र फटाके फोडले गेल्याचे जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिले आहे. ज्या भागातून नेत्याची पदयात्र जाणार असेल, तेथील कार्यकर्ते फटाक्यांची सर रस्त्यावर पसरूनच नेत्याची वाट पाहत असत. निवडणुकीपूर्वी इतके फटाके फुटले, तर निकालानंतर किती फुटतील, याचा अंदाजच न केलेला बरा! या पाश्र्वभूमीवर, प्रदूषणमुक्तीचा हेतू मनात ठेवून विजयी उमेदवारांनी आपल्या कार्यकत्र्याना आधीच आवाहन करावे आणि फटाके फोडण्यापासून परावृत्त करावे, अशी ‘अंनिस’ची भूमिका आहे. येत्या दोन दिवसांत सर्व प्रमुख उमेदवारांना भेटून ही भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (प्रतिनिधी)
 
बालगोपाळांना आवाहन
‘अंनिस’तर्फे दरवर्षी विविध शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन करणारे पत्रक वाटले जाते. या वर्षी फटाकेमुक्तीचे आवाहन करणारे संदेश शाज्ञ जयंत नारळीकर, अभिनेता नाना पाटेकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश आमटे, डॉ. नरेंद्र जाधव यांनी या पत्रकावर केले आहे. या पत्रकाच्या तळाशी एक स्लिप असेल. ‘मी आतार्पयत किती रुपयांचे फटाके फोडत होतो आणि या वर्षी त्यात किती कपात करेन,’ याबाबतचे हे प्रतिज्ञापत्र असेल. पालकांशी बोलून विद्याथ्र्यानी ते भरायचे आहे. गेल्या वर्षी या उपक्रमातून 12 ते 15 कोटींची बचत झाल्याचे स्पष्ट झाले होते. या वर्षी अशी दोन लाख पत्रके काढण्यात आली असून, ती वाटण्यास प्रारंभ झाला आहे.
 
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशेषत: व्यापारीवर्गाकडून मोठय़ा प्रमाणावर फटाके फोडले जातात. लक्ष्मीपूजनापूर्वी अंधश्रद्धा निमरूलन समितीचे पुण्यातील कार्यकर्ते दरवर्षी लक्ष्मी रस्त्यावरून रॅली काढतात आणि कमीतकमी फटाके फोडण्याचे आवाहन करतात. याच धर्तीवर साता:यातही रॅली काढण्याचा प्रयत्न सातारा शाखेकडून सुरू आहे. 
- डॉ. हमीद दाभोलकर