शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
3
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
4
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
5
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
6
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
7
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
8
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
9
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
10
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
11
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
12
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
13
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
14
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
15
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
16
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
17
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
18
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
19
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
20
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!

उमेदवार मुलाखती; राष्ट्रवादीत गोंधळ

By admin | Updated: January 16, 2017 04:04 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा मेळाव्यात ४८ इच्छुक उमेदवाराची नावे घोषित केली.

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोवा मेळाव्यात ४८ इच्छुक उमेदवाराची नावे घोषित केली. संजीव नाईक, आमदार ज्योती कलानी यांच्या उपस्थितीत १८ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केल्याची माहिती पक्षाचे निरीक्षक सुधाकर वढे यांनी दिली, तर पक्षाच्या इच्छुुक उमेदवाराच्या मुलाखती १८ जानेवारीला घेणार असल्याचे नेते प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले. त्यामुळे उमेदवारीवारून पक्षात गोंधळ असल्याचे दिसून आले.महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ५ डिसेंबरला गोव्यात राष्ट्रवादीचा मेळावा झाला. त्याला माजी खा. संजीव नाईक यांच्यासह निरीक्षक वढे, ज्योती कलानी, विरोधी पक्षनेता ठाकूर कुमारी, गटनेता मनोज लासी, युवा नेता ओमी कलानी यांच्यासह कार्यकर्ते व इच्छुक उपस्थित होते. या वेळी संजीव नाईक यांनी ४८ उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना काम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार या उमेदवारांचा प्रचारही सुरू झाला आहे.१८ जानेवारीला इच्छुकांच्या मुलाखती होतील. त्याचदिवशी इतर पक्षातील नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी माहिती प्रमोद हिंदुराव यांनी दिली. ज्योती कलानी यांनी ४६ उमेदवार प्रचाराला लागल्याचे सांगितले. तसेच या घडामोडींची माहिती पक्षाचे नेते व शहराचे प्रभारी गणेश नाईक यांना असल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)