शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ची मतदारांना उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 13:46 IST

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ फ्लेक्सवर झळकणार आहे.

उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ची मतदारांना उत्सुकताफ्लेक्सकडे लक्ष अमरावती : महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या ‘कुंडल्यां’ फ्लेक्सवर झळकणार आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम अतिशय चांगला ठरणारा आहे. राजकीय पक्षाने किती उमेदवार दिले ही माहिती सहजतेने उपलब्ध होईल. मात्र प्रतीज्ञा पत्रात उमेदवारांनी जाहीर केलेली स्थावर व जंगम मालमत्ता किती? याकडे मतदारांची उत्सुकता लागली आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक उमेदवारांना मालमत्तेची माहिती प्रतीज्ञा पत्राद्वारे अनिवार्य केलीे आहे. यात उमेदवारांकडे किती ‘लक्ष्मी’ आहे, हे जाहीर होणार आहे. याच ३ बाय ४ फूट आकार असलेल्या फ्लेक्सच्या आधारे रिंगणातील उमेदवार आमने- सामने येणार आहेत. प्रचारात स्थावर व जंगम मालमत्तेचा मुद्दा उपस्थित करुन एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप होणार आहे. आयोगाने नियम व कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रियेला वळण लावले आहे. अलिकडे राबविली जाणारी आदर्श आचार संहिता ही भयमुक्त निवडणुकांसाठी लाभदायक ठरणारी आहे. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची संपत्ती प्रतीज्ञा पत्राच्या आधारे जाहीर करण्याचा निर्णय मतदारांसाठी जनजागृती करणारा आहे. गुन्हेगारीने बरबटलेल्या राजकारणात स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आणून लोकशाही अधिक बळकट करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. राजकीय पक्ष अथवा आघाड्या उमेदवारी देताना वेगळे निकष लावते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचा राजकारणात सहजतेने प्रवेश होते. मात्र आयोगाने राबविलेली ही संकल्पना निश्चित बदल करणारी ठरेल. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार कोण उमेदवार रिंगणात हे स्पष्ट झाले आहे. गडगंज घरातील व्यक्तींचेही राजकारणाच्या दिशेने पावले पडू लागली आहे. त्यामुळे उमेदवारांनी प्रतीज्ञा पत्रात जाहीर केलेल्या संपत्तीची विवरणपत्रे पाहिले तर स्थावर व जंगल मालमत्तेबाबत अनेक बाबी स्पष्ट होतील. सदृढ लोकशाहीसाठी चांगल्या प्रतिमेच्या उमेदवार असणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेला उमेदवार नको, असे अभिप्रेत आहे. मात्र अमूक पक्षाने उमेदवारी नाकारली की लगेच दुसरा पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्यांना उमेदवारी बहाल करतात, असे चित्र आहे. ही बाब समाजसाठी घातक ठरणारी आहे.दौलतजाद्यांचा उमेदवारीत समावेश४उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतीज्ञापत्रानुसार बहुतांश राजकीय पक्षांनी समाजसेवेला महत्व दिले नसून गडगंज संपत्ती असलेल्यांना उमेदवारी बहाल केली आहे. त्यामुळे समाजसेवेचे व्रत बांधून दिवसरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी नाहीच? असा संदेश राजकीय पक्षाने दिला आहे. राजकीय पक्षाचे निकष व नियमावलीचे ‘पडद्याआड’ पालन करणाऱ्यांना उमेदवारी मिळाली आहे.