शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात मेणबत्ती मोर्चा

By admin | Updated: November 8, 2016 02:18 IST

वृत्तवाहिनीवरील बंदी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. सरकारची दडपशाही आहे. प्रबोधनाचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ करत असतो

ठाणे : वृत्तवाहिनीवरील बंदी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे. सरकारची दडपशाही आहे. प्रबोधनाचे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ करत असतो. त्यांनी कसे वागावे अथवा वागू नये ते सरकारला ठरवता येणार नाही. पत्रकारांना शांत बसवण्याची पद्धत १९३२ साली हिटलरने अवलंबली होती. आणीबाणीतही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अशीच गळचेपी झाली होती. हे केंद्रातील भाजपा सरकारने लक्षात घ्यावे. सरकारने वेळीच धडा घेतला नाही तर जनता यांनाही धडा शिकवेल, असा सूर सोमवारी ठाण्यात काढलेल्या मेणबत्ती मोर्चाद्वारे व्यक्त झाला. हा मोर्चा सुरू असतानाच वृत्तवाहिनीवरील बंदी मागे घेतल्याचे वृत्त समजले.एका वृत्तवाहिनीवर आणलेल्या बंदीच्या निषेधार्थ सोमवारी ठाण्यातील नागरिकांनी एकत्र येत गडकरी रंगायतन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर मेणबत्ती मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले. हातात मेणबत्त्या घेऊन आणि हाताला काळ्या फिती बांधून ठाणेकरांनी निषेध नोंदवला. डोन्ट किल फ्रीडम आॅफ स्पीच, डोन्ट किल फ्रीडम आॅफ एक्सप्रेशन, डोन्ट किल इंडियन कॉन्स्टिट्युशन असे घोषफलक या मार्चमध्ये पाहायला मिळाले. यावेळी निवृत्त न्यायाधीश गुलाबराव अवसरमोल, डॉ.राम माळी, ऋता आव्हाड, डॉ.अभिजीत वैद्य, आनंद परांजपे, नगरसेवक संजय भोईर, सुहास देसाई, अमित सरैय्या तसेच शानू पठाण, उपस्थित होते. (प्रतिनिधी)