शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

-तर कामाचे कंत्राट रद्द करा!

By admin | Updated: October 23, 2014 00:32 IST

कविवर्य सुरेश भट सभागृह प्रकल्पाचे काम रखडले आहे. कंत्राटदार नियमानुसार बांधकाम करीत नसेल त्याचे कंत्राट रद्द करा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले.

रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा : महापौरांचे निर्देशनागपूर : कविवर्य सुरेश भट सभागृह प्रकल्पाचे काम रखडले आहे. कंत्राटदार नियमानुसार बांधकाम करीत नसेल त्याचे कंत्राट रद्द करा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले.जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शहरात विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यातील काही प्रकल्प पूर्णत्वास गेले असून काही प्रलंबित आहेत. अशा प्रकल्पांचा दटके यांनी आढावा घेतला. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकु लवार, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, आयुक्त श्याम वर्धने, स्थापत्य विद्युत व प्रकल्प समितीचे सभापती संदीप जोशी, आरोग्य समितीचे सभापती रमेश शिंगारे, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे, शहर अभियंता संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, अजीर्जूर रहेमान यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सुरेश भट सभागृह, शुक्रवारी येथील नागनदीवरील पूल,नवीन प्रशासकीय इमारत, सिमेंट रोड, दानागंज शॉपिंग मॉल, विवेकानंदनगर येथील इनडोअर स्टेडियम, नद्या व सरोवरे प्रकल्प , एलईडी पथदिवे, सोलर वॉटर हिटर, रामझुला व पेंच प्रकल्प,२४ बाय ७ पाणी पुरवठा योजना आदी विकास कामांचा आढावा दटके यांनी घेतला. सुरेश भट सभागृहाचे काम का रखडले, असा असा सवाल दटके यांनी अधिकाऱ्यांना केला. स्थायी समिती सभापती व स्थापत्य समिती सभापती यांनी बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्याची सूचना दटके यांनी केली. जुनी शुक्रवारी येथील नागनदीवरील पुलाचे काम डिसेंबर २०१४ पर्यत पूर्ण होईल,अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्याचे काम पूर्ण करावे. कामे निर्धारित कालावधीत पूर्ण होण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दहा दिवसात सादर करण्याचे निर्देश दटके यांनी दिले.(प्रतिनिधी)