शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींचा शो रद्द करा - शिवसेना

By admin | Updated: October 7, 2015 15:54 IST

शिवसेनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवत प्रसिद्ध पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे.

 
ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ७ -  शिवसेनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवला असून पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांचा मुंबईत होणारा कार्यक्रम रद्द करा अशी मागणी आयोजकांकडे केली आहे. शो रद्द न केल्यास शिवसेना स्टाईल विरोध करु असा धमकीवजा इशाराच शिवसेनेने दिला आहे. 
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांवर आक्षेप आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रम करु देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने नेहमीच मांडली आहे. आता गझल गायक गुलाम अली यांच्या कार्यक्रमावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा पाकविरोधी सूर आळवला आहे. गझल गायक गुलाम अली यांचा ९ ऑक्टोबररोजी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शो होणार आहे. बुधवारी शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे सचिव अक्षय बद्रापूरकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी षण्मुखानंद सभागृहात जाऊन कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. भारतीय जवानांना मारणा-या पाकसोबतच्या सांस्कृतिक संबंधांना आमचा विरोध असल्याचे अक्षर बद्रापूरकर यांनी सांगितले. हा शो रद्द करावा अशी मागणी करणारे पत्र बद्रापूरकर यांनी आयोजक व षण्मुखानंद प्रशासनाला दिले आहे.