मुंबई : सभागृहात बोलण्याची संधी न मिळाल्याने बुधवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील चांगलेच संतप्त झाले. विरोधी पक्षनेते पदावर बसूनही आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसेल आणि वारंवार आमचा अपमान होत असेल तर हे पदच रद्द करा. आक्रस्ताळेपणा करायचा नाही हा माझा स्वभाव आहे पण तो माझा कदाचित दोष असेल, असा उद्वेग त्यांनी व्यक्त केला. विधानसभेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात तारांकित प्रश्नाला संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने विरोधक संतप्त झाले.
तर विरोधी पक्षनेतेपद रद्द करा
By admin | Updated: April 8, 2015 23:40 IST