शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे ‘कमळ’ चिन्ह रद्द करा; मुंबई उच्च न्यायालयात याचिका

By admin | Updated: July 8, 2016 05:05 IST

‘कमळ’ हे भारताचे राष्ट्रीय फूल असल्याने कोणत्याही राजकीय पक्षास त्याचा राजकीय लाभासाठी उपयोग करू दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक

मुंबई : ‘कमळ’ हे भारताचे राष्ट्रीय फूल असल्याने कोणत्याही राजकीय पक्षास त्याचा राजकीय लाभासाठी उपयोग करू दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह रद्द केले जावे, अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका केली असून त्यात म्हटले आहे की, भाजपाला ‘कमळ’ या राष्ट्रीय फुलाचा निवडणुकीसाठी वापर करू देणे हा १९५० च्या राष्ट्रीय चिन्हे अणि नावांच्या दुरुपयोग प्रतिबंधक कायद्याचा भंग आहे. त्यामुळे भाजपाला दिलेले ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह रद्द करण्याचा आदेश निवडणूक आयोगास द्यावा, अशी याचिकाकर्त्याची विनंती आहे.ही याचिका पुढील आठवड्यात प्राथमिक सुनावणीसाठी न्यायालयापुढे येण्याची अपेक्षा आहे. याचिकेतील मुद्द्यांचा विचार करून ‘कमळ’ निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्यासंबंधीचे सर्व रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडून मागवून घ्यावे व तसे करणे योग्य की अयोग्य याचा निकाल होईपर्यंत हे निवडणूक चिन्ह गोठविले जावे, अशीही मागणी याचिकेत केली गेली आहे. (विशेष प्रतिनिधी)३० वर्षांपासून होतोय याच चिन्हाचा वापर- कमळ हे शुचिता, सुयश, दीर्घायुष्य व भाग्यदायी मानले गेले असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीसाठी त्याचा वापर करू देणे गैर आहे. शिवाय असे करणे उपर्युक्त कायद्यानुसार निषिद्ध असूनही कोणीही आक्षेप न घेतल्याने गेली २५ वर्षे भाजपाकडून ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह वापरले जात आहे, असे याचिका म्हणते.कमळ हे पवित्र फूल असून प्राचीन भारतीय पुराणांमध्ये तसेच कलांमध्ये त्याचे एक आगळे स्थान आहे. कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणूनही ओळखले जाते. कमळ हे देवी लक्ष्मीचे फूल असून ते ऐश्वर्य, सुबत्ता व सुपीकतेचे प्रतीक मानले जाते.- हेमंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते (याचिकाकर्ते)