शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गासंबंधी अधिसूचना सापडेना

By admin | Updated: June 10, 2017 03:20 IST

राज्यातील कोणत्या रस्त्यांना राज्य महामार्गामध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे, यासंदर्भात कोणतेही रेकॉर्ड किंवा अधिसूचना उपलब्ध नसून ‘गूगल’वरही याबाबत काहीच माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोणत्या रस्त्यांना राज्य महामार्गामध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे, यासंदर्भात कोणतेही रेकॉर्ड किंवा अधिसूचना उपलब्ध नसून ‘गूगल’वरही याबाबत काहीच माहिती उपलब्ध नसल्याचे शुक्रवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले. दारू विक्रीसंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणीत राज्य सरकारने ही माहिती दिली.राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर आत असलेल्या दारूविक्री दुकानांवर बंदी घालण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करत राज्य सरकारने काही दारूविक्री करणाऱ्या दुकानांना नोटीस बजावली. मात्र आपली दुकाने राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात येत नसल्याचा दावा करत या सर्वांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. या याचिकांवरील सुनवाणी न्या. शंतनू केमकर व एम.एम. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीत खंडपीठाने राज्य सरकारला संबंधित दुकाने ज्या रस्त्यावर आहेत, ते रस्ते राज्य महामार्गावर येत असल्याचे सिद्ध करण्यासाठी अधिसूचना किंवा कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकील यासंबंधी कोणतीही अधिसूचना किंवा कागदपत्रे न्यायालयापुढे सादर करू शकले नाहीत. ‘संबंधित अधिकाऱ्यांना यासंबंधी कोणतीही अधिसूचना किंवा कागदपत्रे सापडली नाहीत. त्यांनी त्यासाठी ‘गूगल’वरही शोध घेतला. मात्र त्यामध्येही काही माहिती मिळाली नाही,’ असे सरकारी वकिलांनी खंडपीठाला सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने परवान्याचे नूतनीकरण करून दिले नसल्यामुळे विविध शहरांतील पन्नासावर बार व वाईन शॉप मालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केल्या आहेत. याप्रकरणात उच्च न्यायालयाने शुक्रवारी ज्या मार्गांवर ही दुकाने आहेत ते राष्ट्रीय किंवा राज्य महामार्ग असल्याची अधिसूचना सादर करण्याचा आदेश राज्य शासनाला शुक्रवारी दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने वरील आदेश देतानाच प्रबंधक कार्यालयाला या विषयावरील सर्व याचिका एकत्र करण्यास सांगितले. तसेच, शासनाला नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्यासाठी २१ जूनपर्यंत वेळ दिला.