शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘विश्वासू’ माणूस मिळेना?

By admin | Updated: April 20, 2016 05:41 IST

स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेमुळे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे भर न्यायालयात सरकारवरच टीका करून वादग्रस्त ठरलेले राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे

दीप्ती देशमुख, मुंबईस्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेमुळे आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे भर न्यायालयात सरकारवरच टीका करून वादग्रस्त ठरलेले राज्याचे माजी महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी महाधिवक्तापदाचा राजीनामा देऊन तब्बल २९ दिवस उलटले, त्यानंतरही या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. राज्य सरकारला महाधिवक्ता या घटनात्मक पदासाठी ‘विश्वासू माणूस’ मिळत नसल्याने ही नामुष्की ओढवल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपा आणि शिवसेना एकाच वकिलाच्या नावावर शिक्कामोर्तब करेल, असा वकील सध्या तरी मुंबई, औरंगाबाद व नागपूर या तिन्ही खंडपीठामध्ये नाही. त्यामुळे पुढे आणखी काही काळ हे पद रिक्तच राहिल, अशीच शक्यता आहे. सध्या तरी प्रभारी महाधिवक्ता वेळ मारून नेत आहेत. तरीही महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात एवढे दिवस हे पद रिक्त ठेवणे ही बाब लाजिरवाणी असल्याची चर्चा सध्या वकील मंडळींमध्ये सुरू आहे.हे पद घटनात्मक असल्याने, काही कारणास्तव हे पद रिक्त झाल्यास तातडीने भरणे सरकारसाठी बंधनकारक असते. मात्र, युती सरकारला दोन वेळा हे पद भरण्यासाठी विलंब झाला. भाजपा सरकार जेव्हा सत्तेवर आले, तेव्हाही हे पद रिक्तच होते. बऱ्याच उलटसुलट चर्चा-मंथन झाल्यानंतर नागपूरचे ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांची महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, गोवंश हत्याबंदी प्रकरणात मनोहर यांनी सरकारतर्फे खळबळजनक विधान केल्याने त्यांना राजीनामा देणे भाग पडले.या घटनेनंतर महिनाभर महाधिवक्ता हे पद रिक्तच होते. अखेरीस राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर, सरकारने तातडीने ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांची महाधिवक्तापदी नियुक्ती केली. स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेमुळे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर भर न्यायालयात टीकेचा आसूड ओढल्याने अ‍ॅड. अणे यांची महाधिवक्तापदाची कारकिर्द वादग्रस्त ठरली. अ‍ॅड. अणे यांच्यावरून भाजपा आणि शिवसेनेमध्येही चांगलीच जुंपली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याचे पडसाद उमटले, कामकाज रोखण्यात आले. त्यामुळे अ‍ॅड. अणे यांनी २२ मार्च रोजी महाधिकवक्तापदाचा राजीनामा दिला. अ‍ॅड. अणे यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस सरकारने नागपूर खंडपीठातील अ‍ॅडिशनल सॉलिसिटर अ‍ॅड. रोहित देव यांना प्रभारी महाधिवक्ता म्हणून मुंबईत बोलावून घेतले. फडणवीस सरकार रोहित देव यांच्याकडे ‘महाधिवक्तापद’ सोपवण्याचा विचार करत आहे. तशी विचारणाही त्यांच्याकडे करण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी स्पष्ट केले. ‘सरकारची चूक निदर्शनास आणणे गरजेचे’महाधिवक्तापद घटनात्मक आहे. हे पद भूषविणाऱ्या व्यक्तीला विशेष अधिकार आहेत. या पदावर बसणारी व्यक्ती ‘सरकारी कर्मचारी’ नाही. त्यामुळे या पदावर बसणाऱ्याची भूमिका केवळ सरकारची वकिली करण्याइतपत मर्यादित नसावी. सरकार जर कुठे चुकत असेल, तर ती चूक लक्षात आणून देण्याचे कर्तव्य महाधिवक्त्यांचे आहे.- अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी महाधिवक्ता