शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

डॉक्टर संप करू शकतात का?

By admin | Updated: April 13, 2016 02:20 IST

डॉक्टरांचा व्यवसाय ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांना संप करण्याचा अधिकार आहे का? असा थेट सवाल उच्च न्यायालयाने मार्डला केला आहे. यापुढे अशाप्रकारे संप करून

मुंबई : डॉक्टरांचा व्यवसाय ही अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांना संप करण्याचा अधिकार आहे का? असा थेट सवाल उच्च न्यायालयाने मार्डला केला आहे. यापुढे अशाप्रकारे संप करून रुग्णांना वेठीस न धरण्याची हमी डॉक्टरांकडून लिहून घेण्याचे संकेत उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत, तर दुसरीकडे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. ‘तक्रार निवारण समिती’ डॉ. लहानेंवरील आरोपांची चौकशी करणार नाही, अशी माहिती सरकारने उच्च न्यायालयाला दिली.जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी रहिवासी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करू न देण्याचा निर्णय घेतल्याने रहिवासी डॉक्टरांनी संप पुकारला. डॉ. लहाने व नेत्रचिकित्सा विभागप्रमुख रागिणी पारेख यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली. संपाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडविया यांनी कोर्टात अर्ज केला. सुनावणीत कोर्टाने डॉक्टरांना संप करण्याचा अधिकार आहे का? अशी विचारणा मार्डकडे केली.‘आज नाही तर उद्या तुम्हाला (मार्ड) या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. फिरते खंडपीठ हवे, म्हणून राज्यातील सहा जिल्ह्यांतील वकिलांनी संप पुकारला. त्यांच्याकडून संपावर न जाण्याची हमी घेऊनही त्यांनी हे कृत्य केले. त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांनी संप पुकारल्यावर त्यांच्यावर अवमान नोटीस बजावली. तुम्हालाही (डॉक्टर) हमी देण्याची वेळ येणार आहे. मुळातच तुम्ही संपावर जाऊ शकता का, हा प्रश्न आहे,’ अशा शब्दांत न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांनी मार्डला धारेवर धरले. (प्रतिनिधी)ही चौकशी समिती नाहीडॉ. लहाने यांनी सरकारकडून करण्यात येणाऱ्या चौकशीवर आक्षेप घेतला. त्यावर खंडपीठाने नव्याने नेमण्यात येणारी समिती डॉ. लहाने यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करणार का? अशी विचारणा सरकारकडे केली.त्यावर प्रभारी महाअधिवक्ता रोहित देव यांनी ही तक्रार निवारण समिती आहे, चौकशी समिती नाही. त्यामुळे डॉ. लहाने यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाणर नाही, असे स्पष्ट करत, डॉ. लहाने यांना दिलासा दिला.