शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मोहीम

By admin | Updated: March 18, 2017 02:40 IST

राज्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे

मुंबई : राज्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक तयार करावे. या पथकामार्फत मोहीम हाती घेण्यात आली असून रुग्णालयांची तपासणी करण्यात येणार आहे.सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्त्रीभ्रूणहत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, आरोग्य अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत सूचना दिल्या. या वेळी आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.या वेळी डॉ. सावंत म्हणाले की, म्हैसाळ, नाशिक, दौंड या भागात अनधिकृत डॉक्टर आणि रुग्णालयांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यातील नोंदणीकृत दवाखाने, डॉक्टर्स, गर्भपात केंद्रे यांच्यावर वेळोवेळी आरोग्य विभागामार्फत धडक मोहीम हाती घेऊन तपासणी करण्यात येते. मात्र सध्या अनधिकृत डॉक्टर आणि नोंदणीकृत नसलेल्या रुग्णालयांमध्ये अवैधरीत्या गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूणहत्या झाल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी धडक मोहीम हाती घेऊन आरोग्य, महसूल, पोलीस, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांचे पथक तयार करून आपापल्या जिल्ह्यातील रुग्णालये तपासणीची संयुक्त मोहीम हाती घेणार आहे. या पथकामार्फत कारवाईचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात येईल. त्यानंतर समिती त्यावर आवश्यक ती कार्यवाही करेल. पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे समितीच्या बैठका घ्याव्यात, असे निर्देशही डॉ. सावंत यांनी या वेळी दिले.अन्य राज्यांच्या सीमालगतच्या भागात अशा प्रकारच्या घटना वाढत असून त्या राज्यांना संपर्क साधून यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात आल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. तालुकानिहाय आशा व एएनएम आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना या कायद्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)