शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांची मागणी

By admin | Updated: May 1, 2017 18:37 IST

विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीकरिता विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मंगळवार, 2 मे 2017 रोजी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्यपालांची भेट घेणार आहेत.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 1 - महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्या तातडीने नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची आवश्यकता असून, त्या करिता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या मागणीकरिता विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मंगळवार, 2 मे 2017 रोजी सकाळी 11 वाजता राजभवन येथे राज्यपालांची भेट घेणार आहेत.या शिष्टमंडळामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आ. जयंत पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू असीम आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आ. प्रा. जोगेंद्र कवाडे आदींचा समावेश असेल.यासंदर्भात माहिती देताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत की, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. राज्यातील शेतकरी मागील चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक संकटे व सततच्या नापिकीमुळे हवालदिल झाले असून, शेतमालाला भाव मिळत नसल्याने त्यांना कर्जाची परतफेड करणे अशक्य झाले आहे. कर्जाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी कोणतेही पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजास्तव आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पडते आहे.या परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी, त्याच्या आत्मविश्वासाला उभारी मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करण्याची मागणी आम्ही सातत्याने करतो आहोत. परंतु हे सरकार शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यास तयार नाही. शेतकऱ्यांमध्ये नव्याने विश्वास निर्माण करायचा असल्यास तातडीने कर्जमाफी व शेतमालाला हमीभाव देण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसल्याची भावना विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून प्रकर्षाने समोर आली आहे. विधिमंडळात देखील शेतकरी कर्जमाफीसाठी बहुमत असल्याचे विखे पाटील पुढे म्हणाले.  वस्तू व सेवा कर विधेयक अंमलात आणण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने आयोजित केले जात आहे. त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी विधान मंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्य सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलविण्यासंदर्भात निर्देश द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षांचे नेते करणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.