शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ बैठक : ४२९ कोटींच्या प्रकल्पावरून धुसफूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:46 IST

यदु जोशी मुंबई : पोलीस नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक, अग्निशमन दलासाठी १०१ वा रुग्णवाहिकेसाठी १०८ अशा तीन क्रमांकाऐवजी आपात्कालिन सेवांसाठी एकच टोल फ्री क्रमांक स्थापित करण्यासह राज्य पोलीस नियंत्रण कक्षाच्या आधुनिकीकरणासाठी ४२९ कोटी रुपये खर्च करण्याच्या मुद्यावरून गृह आणि वित्त विभागात शाब्दिक खडाजंगी झाली आहे. प्रकल्पाचा मूळ हेतू साध्य होण्याबाबत वित्त ...

यदु जोशी मुंबई : पोलीस नियंत्रण कक्षाचा १०० क्रमांक, अग्निशमन दलासाठी १०१ वा रुग्णवाहिकेसाठी १०८ अशा तीन क्रमांकाऐवजी आपात्कालिन सेवांसाठी एकच टोल फ्री क्रमांक स्थापित करण्यासह राज्य पोलीस नियंत्रण कक्षाच्या आधुनिकीकरणासाठी ४२९ कोटी रुपये खर्च करण्याच्या मुद्यावरून गृह आणि वित्त विभागात शाब्दिक खडाजंगी झाली आहे. प्रकल्पाचा मूळ हेतू साध्य होण्याबाबत वित्त विभागाने साशंकता व्यक्त केली आहे.या आधुनिकीकरणावर ३८४ कोटी ५२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच, याच प्रकल्पांतर्गत वरळी; मुंबई येथे त्यासाठी उभारण्यात यावयाच्या संनियंत्रण, नियोजन व विश्लेषण केंद्रासाठी ४४ कोटी ५४ लाख रुपये खर्च करण्यात येतील.विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तथापि, या निमित्ताने दोन प्रमुख विभागांमधील मतभिन्नतादेखील समोर आली.पहिल्या टप्प्यात नागपूर आणि पुणे येथील प्रकल्प कार्यान्वित करण्यात येतील. त्यानंतरच्या टप्प्यात संपूर्ण राज्यातील पोलीस नियंत्रण कक्षांचे आधुनिकीकरण केले जाईल आणि आपात्कालिन सेवेचे ‘डायल १००’ या सेवेशी एकत्रिकरण करण्यात येईल. शेवटच्या टप्प्यात रुग्णवाहिका सेवेच्या १०८ ऐवजी १०० हा एकच क्रमांक असेल. शेवटच्या टप्प्यात अग्निशमन यंत्रणेसाठीच्या १०१ क्रमांकाचे एकत्रिकरण १०० सोबत करण्यात येणार आहे. सर्व प्रमुख आपात्कालिन क्रमांकांच्या एकत्रिकरणाचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतला असून विविध राज्ये आता त्याची अंमलबजावणी करणार आहेत.वित्त विभागाने आधी या प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्याचे मुख्य कारण आपत्कालिन व्यवस्था एकाच छताखाली येतील, असे गृह विभागाने आधी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या सादरीकरणात म्हटले होते. तथापि, मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी जो प्रस्ताव आला त्यात ही योजना टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाईल आणि पहिल्या टप्प्यात पोलीस नियंत्रण कक्षाचे आधुनिकीकरण केले जाईल, असे नमूद केले. त्यामुळे मूळ सादरीकरणात दाखविलेला उद्देश सफल होत नाही, असा शेरा वित्त विभागाने दिला आहे. गृह विभागाने मात्र, या प्रकल्पामुळे पोलीस नियंत्रण यंत्रणेचे आधुनिकीरण होईल आणि आपत्कालिन सेवा एकाच छत्राखाली येतीलच असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या सादरीकरणाची वित्त विभागाला कल्पना देण्यात आली होती.